मुंबई : 9 डिसेंबरला लग्न केल्यानंतर विकी आणि कतरीना थेट हनीमूनला मालदीवला रवाना झाले होते. त्यानंतर ते आज लग्नानंतर पहिल्यादांच मुंबईत पोहोचले आहेत. यावेळी कतरीना एका वेगळ्या रुपात दिसून आली. ही नवी जोडी आज मुंबई विमानतळावर दिसून आली. यावेळी चर्चा होती ती फक्त आणि फक्त विकी-कतरीनाच्या लुकची. एअरपोर्टवरील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. कारण कतरीनाच्या चाहत्यांनी तिला कधीच या रुपात बघितले नव्हेत.
कतरीना हटके लुकमध्ये दिसून आली
लग्नानंतर पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर कतरीना अतिशय सुंदर रुपात दिसून आली. यावेळी तिने कंपाळवरती कुंकू लावले होते, गळ्यात मंगळसूत्र घातले होते, हातात चुडा भरलेला होता. आणि फिक्या गुलाबी रंगाचा चुडीदार परिधान केला होता. कतरीनाला या रुपात पहिल्यांदा बघून चाहत्यांच्या नजरा खिळल्या, विकी मात्र यावेळी व्हाईट शर्टमध्ये साध्या वेशात दिसून आला.
राजस्थानपासून मुंबईपर्यंतच्या फोटोंची सर्वत्र चर्चा
विकी आणि कतरीनाने शाही पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो चाहत्यांना पहायला मिळाले. त्यांच्या लग्नाला काही मोजकीच मंडळी उपस्थित होती. लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. काही जण तर भन्नाट मीम्सही बनवत आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये याच लग्नाची चर्चा आहे.
लग्नानंतर मुंबईहून थेट मालदीवला
लग्नानंतर ही जोडी मुंबई विमानतळावरूनच थेट हनीमूनला रवाना झाली होती. त्यानंतर आज ते मुंबईत परतले आहेत. त्यामुळे या नवविवाहीत सुपरस्टार जोडीला पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत. त्यांच्यावर देशभरातून नव्या सुरूवातीसाठी शुभेच्छांचा वर्षावही होत आहे.