Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, आनंद व्यक्त करत म्हणाली…

| Updated on: Nov 17, 2024 | 2:17 PM

Miss Universe 2024: डेनमार्कची विक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’ आणि भारताची सौंदर्यवती रिया सिंघा..., सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल... चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Miss Universe 2024: डेनमार्कची व्हिक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, आनंद व्यक्त करत म्हणाली...
Follow us on

Miss Universe 2024 : पुन्हा एकदा जगाला मिस यूनिवर्स 2024 भेटली आहे. Miss Universe च्या नावाची घोषणा करण्यात आलं आहे. यावेळी मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर हिने मिळवला आहे. तिने मिस युनिव्हर्स बनून स्वतःच्या देशाचं नाव मोठं केलं आहे. पहिली रनरअप नायजेरियाची चिडिन्मा अदेत्शिना, दुसरी रनरअप मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान, तर तिसरी रनपअप थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री ठरली आहे.

‘मिस युनिव्हर्स 2024’च्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी 18 वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा टॉप-12 मधूनच बाहेर झाली. 73 वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा यंदा मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 125 देशातील स्पर्धकांनी भाग घेतला.

कोण आहे विक्टोरिया कजेर?

 

 

आपल्या सौंदर्याने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी व्हिक्टोरिया कजेल एक उद्योजिका आणि वकील आहे. 21वर्षांची व्हिक्टोरिया कजेर उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डोक्यावर मुकुट घातल्यानंतरही, व्हिक्टोरिया केजर म्हणाली की, ती तिची जीवनशैली कधीही बदलणार नाही. आजपर्यंत मी ज्या प्रकारे जगत होती, भविष्यातही तशीच राहीन. असं देखील व्हिक्टोरिया म्हणाली.

 

 

पुढे व्हिक्टोरिया म्हणाली, ‘आपल्याला अपल्या चुकांमधून नेहमी नवीन काही तरी शकता यायला हवं. प्रत्येक दिवशी काही तरी नवीन शिकता आलं पाहिजे आणि भविष्यात त्याचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे. मी प्रत्येक दिवस त्या दिवसाच्या अनुसार जगते… स्वतःला कायम सकारात्मक ठेवण्याचा विचार करते.’ असं देखील व्हिक्टोरिया म्हणाली.