बिग बॉस फेम अभिनेता अभिषेक कुमारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होतं आहे
हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याला 'उडारियां' या मालिकेपासून प्रसिद्धी आणि एक ओळख मिळाली. आता अभिषेकला चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची इच्छा आहे. आपल्या क्षेत्रात अजून छान काम करण्यासाठी, शिकण्यासाठी अभिषेक एक्टिंग वर्कशॉप आणि क्लासेसही घेत आहेत
अभिषेकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होतं आहे. यामध्ये अभिषेकने अंगात लाल रंगाचा लेहंगा-चोळी परिधान केली आहे. तसेच ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, कानात डूल, गळ्यात दागिना असा मेकअपही केला आहे.
अभिषेकचे हे रुप पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र हा पेहराव अभिषेकने त्यांच्या अॅक्टींग वर्कशॉपसाठी आणि एका अॅक्टसाठी केला होता. आणि तेव्हा त्याने व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी मजेशीर कमेंट केलेल्याही पाहायला मिळाल्या
अभिषेकला मालिकेपेक्षा जास्त ओळख मिळाली ती बिग बॉसच्या शोमुळे. बिग बॉसच्या घरातील त्याचे वागणे- बोलणे सर्वांनाच भावले होते. चाहत्यांनी अभिषेकला बिग बॉसच्या घऱात नक्कीच पसंत केलं होतं.