Vidya Balan | ‘महिला त्यांची कमाई पुरुषांना देतात कारण…’, विद्या बालन हिचं सडेतोड वक्तव्य

| Updated on: Sep 17, 2023 | 5:10 PM

Vidya Balan | कायम महिलांची बाजू घेणारी विद्या बालन गडगंज पैसा कमावणाऱ्या महिलांबद्दल म्हणाली..., सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या वक्तव्याची चर्चा... पतीबद्दल देखील अभिनेत्री केलं मोठं वक्तव्य... विद्या बालन हिने व्यक्त केलेलं स्वतःचं मत तुम्हाला कसं वाटलं...

Vidya Balan | महिला त्यांची कमाई पुरुषांना देतात कारण..., विद्या बालन हिचं सडेतोड वक्तव्य
Follow us on

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री विद्या बालन (vidya balan) कायम महिलांच्या सबलीकरणाबद्दल आणि सशक्तीकरणाबद्दल वक्तव्य करत असते. विद्या बालन हिने स्वतःच्या महनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. म्हणून अनेक महिलांसाठी अभिनेत्री प्रेरणास्ठानी आहे. आता देखील विद्या बालन हिने महिलांबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. यावेळी विद्या बालन हिने महिलांच्या कमाईबद्दल आणि महिला आपली कमाई पुरुषांच्या हातात देतात… यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत विद्या महिलांच्या पैसे नियोजन आणि सशक्तीकरणाबद्दल वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘अनेक महिला अशा आहेत, ज्या आज स्वतःच्या मेहतीने पुढे आल्या आहेत. ज्यांचं करिअर उत्तम मार्गावर आहे. अनेक महिला आज पैसे कमावत आहेत. पण त्या महिला म्हणतात मी माझे चेक आणि पैसे पतीच्या हातात देते.’

‘महिला स्वतःचे पैसे पतीच्या हातात देतात, कारण त्यांना असं वाटतं पैशांचं नियोजन पुरुष उत्तम प्रकारे करु शकतात. पण मला असं वाटतं पैशांचं नियोजन पुरुषांनीच करावं याची काय गरज आहे? कारण पैसेच ताकद आहे आणि तुम्हाला नाही वाटत तुमच्या घरातील पुरुषाला कोणती भीती असावी…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणते, ‘माझी एक मैत्रिण आहे, ती म्हणते ‘आमचं एक जॉइन्ट खातं आहे. मला पैशांबद्दल काहीही माहिती नसतं’ यावर विद्या म्हणाली, ‘तुला तुझ्या पैशांबद्दल का काही माहिती नसतं. तू इतकं चांगलं काम करत आहेत, उत्तम कमाई करत आहेस. असं असताना तुला का नाही माहिती तुझ्याकडे किती पैसे आहेत?’

‘आर्थिक दृष्ट्या जे काही करायचं आहे, तो सर्वस्वी महिलांचा निर्णय असला पाहिजे. महिला आर्थिक जबाबदारी घेत नाहीत. कारण त्यांना लहानपणापासून शिकवण्यात आलं असतं की, एक पुरुषच सर्व काही नियंत्रित, सांभाळू शकतो आणि ते असचं राहिलं पाहिजे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

स्वतःच्या पतीबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी फार आनंदी आहे, कारण माझं अशा पुरुषासोबत लग्न झालं जो कायम मला प्रेरित करत असतो… तू सर्व काही करु शकतेस याची जाणीव मला कायम करून देत असतो…’ सध्या सर्वत्र विद्या बालन हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.

विद्या बालन हिने १४ डिसेंबर २०१२ मध्ये निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं. सिद्धार्थ रॉय कपूर आणि आदित्य रॉय कपूर भाऊ आहेत. पण विद्या आणि सिद्धार्थ कायम कॅमेऱ्यापासून दूर असतात. विद्या बालन फक्त तिच्या खासगी नाही तर प्रोफेशलन आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.