Vidya Balan casting couch : झगमगत्या विश्वात प्रसिद्ध कलाकार होण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. पण झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक कठीण प्रसंगांना समोरं जावं लागतं. कधी भूमिका मिळत नाही , तर कधी प्रेक्षकांना सिनेमा आवडत नाही.. तर यशाच्या शिखरावर चढत असताना समोर येतो कास्टिंग काऊचसारखा प्रसंग. आजपर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. पूर्वी अभिनेत्री कास्टिंग काऊचवर उघडपणे बोलत नव्हत्या, पण आता कास्टिंग काऊचचा आलेला धक्कादायक अनुभव अभिनेत्री चाहत्यांसोबत शेअर करतात आणि घडलेली घटना उघडपणे सांगतात. अभिनेत्री विद्या बालन हिने देखील कास्टिंग काऊच सारख्या प्रसंगाचा सामना केला आहे.
कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, ‘मी स्वतःला नशीबवान समजते, की मला कास्टिंग काऊचसारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. मी कास्टिंग काऊचबद्दल अनेक भयानक अनुभन ऐकले आहेत. याच कारणामुळे बॉलिवूडमध्ये येण्यास माझ्या आई – वडीलांचा नकार होता.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या लक्षात आहे. मी चेन्नईमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेली होती. तेव्हा एका दिग्दर्शकासोबत माझी बैठक होती. दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी माझी निवड केली. जेव्हा कॉफी शॉपमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा त्याला मला त्याच्या खोलीत घेवून जायचं होतं. मला काही कळत नव्हतं. मी तेव्हा घाबरली होती. ‘
‘जेव्हा त्याच्या खोलीत गेलो, तेव्हा मी दरवाजा बंद केला नाही. कारण तेथून पळ काढण्याचा तोच एक मार्ग होता. महिलांचा सिक्स सेन्स फार चांगला असतो आणि मला कळालं होतं त्याला फायदा घ्यायचा आहे. पण तेथून मी पळ काढला…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
विद्या बालन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. यशाच्या उच्च शिखरावर चढताना विद्याला अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला. अभिनयाच्या प्रवासात विद्याच्या अनेक सिनेमांना यश मिळाळं, तर अभिनेत्रीचे अनेक सिनेमे फ्लॉप देखील ठरले..
विद्या बालन हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. विद्याने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. विद्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. विद्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमलेली असते. सोशल मीडियावर देखील विद्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.