मुंबई : रश्मिका मंदाना हिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. यानंतर अनेकजण हे रश्मिका मंदाना हिच्या समर्थनार्थ मैदान आले. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले. रश्मिका मंदाना हिचा एक मॉर्फ्ड व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर रश्मिका मंदाना हिने एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली. या व्हिडीओनंतर लोकांमध्ये एक मोठा संताप बघायला मिळाला.
नुकताच आता विजय देवरकोंडा याने रुमर्ड गर्लफ्रेंड रश्मिका मंदाना हिच्या त्या फेक व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय. रश्मिका मंदाना हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या विरोधात सरकारने मोठे अॅक्शन देखील घेतले आहे. जवळपास सर्वांनीच त्याचे समर्थन देखील केले. आता त्याबद्दलचीच एक पोस्ट सोशल मीडियावर साऊथ स्टार विजय देवरकोंडा याने शेअर केली.
विजय देवरकोंडा याने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, खरोखरच भविष्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे पाऊल आहे. हे कोणाच्यासोबतही होऊ नये. फक्त हेच नाही तर अशा घटना तात्काळ थांबवून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी सक्षम सायबर विभाग तयार व्हायला हवा. आता विजय देवरकोंडा याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या व्हिडीओला रश्मिका मंदाना हिचा चेहरा लावण्यात आला. हे एका अॅपच्या मदतीने करण्यात आले. मात्र, अगोदर ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यावेळी अनेकांना वाटले की, खरोखरच हा रश्मिका मंदाना हिचाच व्हिडीओ आहे. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. लोक त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना दिसले.
रश्मिका मंदाना हिच्यासोबत झालेल्या या सर्व प्रकारानंतर विजय देवरकोंडा याने देखील संताप व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहे की, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे एकमेकांना डेट करत आहेत. मालदीवचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, आतापर्यंत रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या रिलेशनवर काहीच भाष्य हे केले नाहीये.