मुंबई : आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) गेल्या बर्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान आमिर खानसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अशी चर्चा होती की, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतिही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण आमिर आणि विजय सेतूपति यांच्यात सर्व काही ठीक नव्हते, अशी चर्चा होती. (Vijay Sethupathi explained the reason for exiting the film ‘Lal Singh Chadha’)
विजय सेतूपतिच्या वाढलेल्या वजनामुळे आमिर खान चिडला होता. यानंतर विजय सेतूपतिने ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सोडला अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र, आता या सर्व प्रकरणावर स्वत: विजय सेतूपतिने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लाल सिंह चड्ढा चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले आहे की, तारखांमुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे सांगितले आहे. विजय सेतूपतीचा मास्टर चित्रपट मास्टर नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
कोरोना काळानंतरही या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले आहे. तामिळ सुपरहिट चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये आमिर खान दिसणार होता, पण त्याने अचानक चित्रपट करण्यास नकार दिला आहे. आता आमिरऐवजी हृतिक रोशनला चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले आहे. तमिळ विक्रम वेधा चित्रपटात, आर माधवन आणि विजय सेतूपती मुख्य भूमिकेत होते.
‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशनसोबत सैफ अली खान सुद्धा दिसणार आहे. मूळ चित्रपटात आर माधवन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. विजय सेतूपतिने गँगस्टर वेधाची भूमिकेत होता. हिंदी रिमेकमध्ये हृतिक गँगस्टरची भूमिका साकारणार आहे, तर सैफ पोलिस अधिकारी म्हणून दिसणार आहे.
संबंधित बातम्या :
‘रुही’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, राजकुमार-जाह्नवीच्या जबरदस्त अभिनय!
अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट
मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
(Vijay Sethupathi explained the reason for exiting the film ‘Lal Singh Chadha’)