Tamannaah Bhatia | ‘मी प्रयत्न करत आहे…’, तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये विजय ‘या’ गोष्टीचा करतोय सामना

| Updated on: Aug 19, 2023 | 11:44 AM

Tamannaah Bhatia | तमन्ना हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे विजय 'या' गोष्टीचा करतोय सामना... अभिनेत्याने अखेर बोलूनच दाखवलं... सध्या सर्वत्र विजय आणि तमन्ना यांच्या नात्याची चर्चा..

Tamannaah Bhatia | मी प्रयत्न करत आहे...,  तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये विजय या गोष्टीचा करतोय सामना
Follow us on

मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वात कायम चर्चाचे विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे एकमेकांसोबत असलेले खास कनेक्शन. बॉलिवूडमध्ये कधी कोणत्या अभिनेत्री नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जाईल काही सांगता येत नाही. आता देखील अशा दोन सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत ज्यावर चाहत्यांचा विश्वात देखील बसणार नाही. वर्षाच्या सुरुवातील अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या होत्या. पण काही दिवस नात्यावर मौन बाळगल्यानंतर दोघांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिली. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांनी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. आता देखील रिलेशनशिपमधील एका खास गोष्टीमुळे दोघे चर्चेत आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि विजय त्यांच्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील केलं जातं. पण मिळणारी लाईमलाईट अभिनेत्याला आवडत नाही. प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त लोकांना माझ्या खासगी आयुष्यात अधिक रस आहे…. ही गोष्ट मला कायम खटकते… असं खुद्द अभिनेता विजय वर्मा म्हणाला आहे.

हे सुद्धा वाचा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘सर्वप्रथम माझ्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आम्ही डिमांडिंग कपल्सपैकी एक आहोत.. असं अनेकांना वाटतं… हे फार चांगलं आहे… मी पूर्वी एकटा फिरायचो आता माझ्यासोबत तमन्ना असते आम्ही एकत्र फिरतो… पण आता आम्हाला प्रचंड लाईमलाईट मिळते…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

 

 

पुढे अभिनेता म्हणाला, ‘मिळणाऱ्या लाईमलाईटची मला इतकी सवय नाही… यासाठी मी आता प्रयत्न करत आहे..’ सध्या सर्वत्र विजय वर्मा याच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, विजय आणि तमन्ना यांच्या नात्याच्या चर्चांना सुरुवात २०२३ वर्षाच्या सुरुवातीला सुरु झाली. दोघांनी नव्या वर्षाचं स्वागत गोवा याठिकाणी एकत्र केलं होतं.

एवढंच नाही तर, तमन्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील विजय आणि तमन्ना एकत्र होते. विजय आणि तमन्ना यांनी ‘लस्ट स्टोरिज 2’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, दोघांमध्ये प्रेम बहरलं… त्यानंतर एका मुलाखतीत तमन्ना हिने विजय याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला होता… शिवाय दोघांनी एकत्र केलेलं फोटो शूट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.