Vikas Malu on Satish Kaushi Death : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सतीश यांच्या मृत्यूप्रकरणी उद्योजक विकाल मालू (Vikas Malu) यांचं नाव समोर येत आहे. मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांनी दिल्ली मधील बिजवासन याठिकाणी असलेल्या विकास मालू यांच्या फार्म हाऊसवर होळी निमित्त पार्टी केली. पार्टीनंतर सतीश यांची प्रकृती खालावली. त्यानंतर तात्काळ सतीश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. आता याप्रकरणी विकास मालू यांनी मोठा खुलासा केला आहे. सतीश कौशिक याच्या मृ्त्यूप्रकरणी विकास मालू यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर उद्योजकाने मौन सोडलं आहे.
विकास मालू यांनी इन्स्टाग्रामवर सतीश कौशिक यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सतीश कौशिक होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. व्हिडीओ पोस्ट करत विकास यांनी स्वतःवर करण्यात आलेल्या आरोपांवर मौन सोडलं आहे. सध्या विकास मालू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र विकास मालू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा आहे. (Vikas Malu on Satish Kaushi Death )
विकास मालू म्हणाले, ‘सतीश माझे गेल्या ३० वर्षांपासून माझे मित्र आहेत. माझ्या नावाचा वाईट वापर करण्यापूर्वी एक क्षण देखील कोणी विचार केला नाही. होळीचा आनंद साजरा केल्यानंतर जे काही झालं, त्या घटनेतून आम्ही अद्याप बाहेर आलेलो नाही. या प्रकरणी मौन सोडत मला एकच सांगायचं आहे. गोष्टी कायम नकळत होतात आणि त्या कोणाच्याही हातात नसतात.’
विकास पुढे म्हणाले, ‘मझी माध्यमांनी विनंती आहे की, सर्वांच्या भावनांचा सन्मान करा. यापुढे आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सतीश यांची आम्हाला आठवण येईल..’ असं देखील मालू पोस्टमध्ये म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे विकास मालू यांच्या पत्नीने सतीश कौशिक यांच्या निधन प्रकरणात धक्कादायक आरोप केले आहेत.
तब्बल १५ कोटी रुपयांच्या वादामुळे विकास मालू यांनी सतीश कौशिक यांची हत्या केल्याचा दावा विकास यांच्या पत्नीने केला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी तिच्या विकास यांनी सतीश कौशिक यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. मात्र पतीकडे परत करण्यासाठी पैसे नव्हते या वादातून विकास यांनी ही हत्या केली. असे गंभीर आरोप विकास मालू यांच्या पत्नीने केले आहेत.