Satish Kaushik : दिल्ली पोलिसांनी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कैशिक यांच्या निधनानंतर चौकशी सुरु केली आहे. दिल्ली याठिकाणी उद्योजक विकास मालू यांच्या फार्म हाऊसवर होळी निमित्त पार्टी केल्यानंतर सतीश कौशिक यांचं ८ मार्च रोजी रात्री १२ वाजता निधन झालं. त्यानंतर सतीश कौशिक यांचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि हृदय विकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पण सतीश कौशिक यांनी ज्या फार्म हाऊसमध्ये पार्टी केली, त्या फार्म हाऊसच्या मालकाच्या पत्नीने पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर पोलीस फार्म हाऊसचे मालक विकास मालू यांची चौकशी करण्यासाठी फार्महाऊसवर पोहोचले.
सतीश कैशिक यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीने लावलेले सर्व आरोप विकास मालू यांनी फेटाळले आहेत. विकास मालू म्हणाले, ‘जर पत्नी माध्यमांसमोर चुकीचा प्रचार करत असले तर, त्याबद्दल मी काहीही करु शकत नाही. पोलीस आणि सरकार दोघे आहेत. जर मी काही चुकीचं केलं असेल, तर त्याच्या परिणामांसाठी मी तयार आहे. ती करत असलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी पुरावे सादर करायला हवे.’
विकास मालू पुढे म्हणाले, ‘सतीश कौशिक आणि माझे कैटुंबिक संबंध होते. त्यांच्यासोबत मी कधीही कोणताही व्यवसाय केलेला नाही आणि जे लोकं दावे करत आहेत, त्यांनी पुरावे सादर करायला हवेत..’ असं देखील विकास मालू यांनी सांगितलं आहे.
Satish Kaushik’s death case: Delhi Police reached Vikas Malu’s farmhouse pic.twitter.com/RPLGYBzWIv
— ANI (@ANI) March 12, 2023
सध्या सर्वत्र अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाने खळबळ माजली आहे. होळी पार्टी झाल्यानंतर सतीश कौशिक यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि छातीत दुखू लागल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादम्यान सतीश यांनी अखेरचा श्वास घेतला. आता सतीश कौशिक यांचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं याची दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत.
ज्या फार्म हाऊसमध्ये पार्टी सुरु होती, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी होळीची पार्टी केली होती. त्याठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी काही औषधं जप्त केली आहेत. यामध्ये सतीश यांची नियमीत ओषधं होती. याशिवाय काही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी कोणती गोष्ट समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.