सिद्धू मूसेवाला याचा गुन्हेगार अटक, सलमान खानला दिली होती जीवे मारण्याची धमकी, थेट दुबईमधूनच…

| Updated on: Jul 27, 2023 | 3:28 PM

बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये देखील यामुळे मोठी वाढ ही करण्यात आलीये. सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच लॉरेंस बिश्नोई याने म्हटले होते.

सिद्धू मूसेवाला याचा गुन्हेगार अटक, सलमान खानला दिली होती जीवे मारण्याची धमकी, थेट दुबईमधूनच...
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याला सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आलीये. मुंबई पोलिसांसह खासगी सुरक्षारक्षक हे सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आली. लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) हा सतत सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देताना दिसत आहे. लॉरेंस बिश्नोई याने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत जेलमधून दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे थेट म्हटले होते.

सिद्धू मूसेवाला याच्याप्रमाणेच सलमान खान हा देखील आमच्या टार्गेटवर असल्याचे लॉरेंस बिश्नोई याने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये भर रस्त्यात लॉरेंस बिश्नोई याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. याचे अनेक व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. लॉरेंस बिश्नोई याच्या निशाण्यावर सलमान खान हा आहे.

लॉरेंस बिश्नोई हा जरी जेलमध्ये असला तरीही त्याची गॅंग ही विक्रम बराड हा दुबईमधून चालवत होता. आता लॉरेंस बिश्नोई याच्या गॅंगला मोठा धक्का बसला आहे. कारण लॉरेंस बिश्नोई याच्या गॅंगचा महत्वाचा सदस्य म्हणजेच विक्रम बराड याला थेट दुबईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे हा मोठा झटका नक्कीच असणार आहे.

विक्रम बराड यानेच सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे देखील सांगितले जाते. इतकेच नाही तर सिद्धू मूसेवाला याचा मारेकरी ही विक्रम बराड हाच आहे. आता विक्रम बराड याची चाैकशी मुंबई पोलिस करण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे विक्रम बराड याला दुबईमधून अटक करण्यात आलीये.

विक्रम बराड यानेच सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी धमकीचे पत्र दिले होते. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला आणि त्या फोनमध्ये सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांकडून एकाही ताब्यातही घेण्यात आले होते.