बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी प्रसिद्धी झोतात येण्यासाठी फार काळ लागला नाही. सिनेमे, अनेक शोंच्या माध्यमातून सेलिब्रिटी चर्चेत आले आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता विंदू दारा सिंग… विंदू दारा सिंग याने अनेक सिनेमे आणि शोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण विंदू दारा सिंग त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला. अनेक वादग्रस्त प्रकरणांसोबत अभिनेत्यांचं नाव जोडण्यात आलं.
विंदू दारा सिंग याचा जन्म 6 मे 1964 मध्ये झाला. विंदू दारा सिंग याचे वडील दारा सिंग होते. दारा सिंग यांनील देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. विंदू दारा सिंग याने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण मॅच फिक्सिंगपासून सेक्स रॅकेटपर्यंत प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्याची लोकप्रियता कमी झाली.
रिपोर्टनुसार, 2013 मध्ये विंदू दारा सिंग याचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये समोर आलं. तेव्हा विंदू दारा सिंग याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी होती. अनेक सामन्यांमध्ये विंदू दारा सिंग क्रिकेटपटू धोनी याची पत्नी साक्षीसोबत दिसल्याने फिक्सिंगबाबतचा संशय अधिक गडद झाला. बुकी रमेश वोहरा याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विंदू दारा सिंगलाही अटक केली होती. विंदूला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
सेक्स रॅकेटमध्ये देखील विंदू दारा सिंग याचं नाव आलं होतं. विंदू दारा सिंगचेही आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटशी संबंध असल्याचा दावा 2013 मध्ये मुंबई पोलिसांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांच्या हाती एक व्हिडीओ लागला होता. ज्यामध्ये ज्यामध्ये कझाकस्तानमधील काही मुली विंदू दारा सिंगसोबत दिसत होत्या आणि त्या व्हिसावर आल्या होत्या…
विंदू दारा सिंग याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘करण’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 1996 मध्ये विंदू दारा सिंग याने पंजाबी सिनेविश्वात पदार्पण केलं. पण मोठ्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर विंदू दारा सिंग याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला…
‘बिग बॉस 3’ मध्ये विंदू दारा सिंग याने स्पर्धक म्हणून एन्ट्री केली आणि विजय होऊन घराबाहेर आला… पण 2013 हे साल अभिनेत्यासाठी फार वाईट ठरला. 2013 मध्येच विंदू दारा सिंग याचं नाव मॅचफिक्सिंग आणि सेक्स रॅकेटमध्ये आलं. आता देखील अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता आज रॉयल आयुष्य जगतो…