Vishhal Nikam: मराठी बिग बॉस विजेता विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन

| Updated on: Jul 04, 2022 | 8:20 AM

वारकऱ्यांच्या मनातली विठ्ठला प्रती असलेली आर्तता नेमकेपणानं मांडण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक खेळ आणि ग्यानबा, तुकारामच्या घोषात आषाढी वारी पंढरीला जात असताना "पंढरीच्या पांडुरंगा" हा म्युझिक व्हिडिओ मनाला शांतता आणि आनंद देऊन नक्कीच सर्वांच्या पसंतीला उतरेल.

Vishhal Nikam: मराठी बिग बॉस विजेता विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन
Vishhal Nikam
Image Credit source: Tv9
Follow us on

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत. वारकऱ्यांच्या मनातली ही भावना पंढरीच्या पांडुरंगा या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओद्वारे मांडण्यात आली असून मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनचा विजेता विशाल निकम (Vishhal Nikam) या म्युझिक व्हिडिओद्वारे विठ्ठलभक्तीमध्ये (Vitthal) तल्लीन झाला आहे. हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल. साईनाथ राजाध्यक्ष आणि बिना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकनं पंढरीच्या पांडुरंगा या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. प्रवीण भुसे यांचे शब्द तर विशाल भांगे यांनी संगीतबद्ध केले आहेत. तर प्रवीण कुंवर यांनी हे गाणं गायलं आहे. संगीत संयोजन विशाल सदाफुले यांचं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम आणि छायांकन मंगेश गाडेकर यांनी केलं आहे. यात विशाल निकमसह रेखा डी. सुहास जाधव यानी काम केलं आहे.

‘पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ असे भावगर्भ शब्द आणि तितक्याचं श्रवणीय संगीतानं हा म्युझिक व्हिडिओ सजला आहे. वारकऱ्यांच्या मनातली विठ्ठला प्रती असलेली आर्तता नेमकेपणानं मांडण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक खेळ आणि ग्यानबा, तुकारामच्या घोषात आषाढी वारी पंढरीला जात असताना “पंढरीच्या पांडुरंगा” हा म्युझिक व्हिडिओ मनाला शांतता आणि आनंद देऊन नक्कीच सर्वांच्या पसंतीला उतरेल.

पहा व्हिडीओ-

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच विशाल त्याच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त झाला. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विशालने सौंदर्याशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. ज्या सौंदर्याचा उल्लेख तो बिग बॉसच्या घरात करायचा, आता मात्र तिच्याशी काहीच संपर्क नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. मी सौंदर्याशी कमिटेड असून आमच्या लग्नातही तुम्हाला बोलावेन, असंही तो बिग बॉसच्या घरात म्हणाला होता. मात्र बिग बॉसनंतर या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.