अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अत्याचाराचे आरोप केल्यानंतर तनुश्री दत्ताने ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तनुश्री दत्ता हिच्या चर्चा रंगल्या आहे.
तनुश्री दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘ढोल’ आणि ‘आशिक बनाया आपने’ सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अनेक वर्षांनंतर तनुश्री दत्ताने सिनेमाच्या सेटवर माझ्यासोबत गैरवर्तन झाल्याची कबुली दिली. मीटू मोहिमे अंतर्गत अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. पण नाना पाटेकर यांनी सर्व आरोप फेटाळले.
दरम्यान, तनुश्री दत्ताच्या निशाण्यावर विवेक अग्निहोत्री देखील आहेत. तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘चॉकलेट’ सिनेमात काम केलं होतं 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेता इमरान हाश्मी, इरफान, अनिल कपूर आणि सुनील शेट्टी देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
सध्या Reddit वर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विवेक यांनी सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीला कशी वगणूक दिली… यावर अभिनेत्री बोलताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘एकदा सेटवर पोहोचण्यासाठी मला 5 मिनिटं उशीर झाला होता. पण अनेकदा तर सेट तयार देखील नसायचा..’
‘विवेक माझ्यावर प्रचंड ओरडले, मला अनेप्रोफेशनल म्हणाले… मला एकदाच लेट झाला होता. पण नेहमी सेटवर सर्वात आधी मी असायचे… कधीकधी लाईट देखील लावून झालेल्या नसायच्या. शूटिंगच्या दरम्यान मला आराम करण्यासाठी व्हॅनमध्ये आणि रोब घालण्याची देखील परवानगी नव्हती.’
‘मला छोट्या कपड्यांमध्ये बसवलं जायचं… शॉट नसेल तर अभिनेत्रींना व्हॅनमध्ये बसवलं जातं. विशेषतः सीनमध्ये छोटे कपडे असतील तर… पण मला रोब घालण्याची देखील परवानगी नव्हती… मी रोब घालायची तर विवेक कायम मला म्हणायचे, शॉट येणार आहे. रोब घालू नकोस काढून ठेव असं म्हणायचा आणि मला समोर बसवून ठेवायचा…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
तनुश्री दत्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.