Vivek Oberoi on Salman Khan And Aishwarya Rai: नुकताच झालेल्या एका मुलखातीत अभिनेता विवेत ओबेरॉय याने टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत विवेक याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यापासून अभिनेता अभिषेक बच्चन बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. मुलाखतीत ऐश्वर्याचं नाव ऐकेताच अभिनेता ‘प्लास्टिक की स्माईल…’ असं म्हणाला आहे. आता विवेक ओबेरॉय याने केलेलं वक्तव्य सध्या तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विवेक याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
विवेक ओबेरॉय याने आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल सांगितलं. या सगळ्यातून तो कसा बाहेर पडला याचं उत्तरही त्याने दिलं. यावेळी त्याने सर्व गोष्टींचा सामना कसा केला आणि त्याला बॉलिवूडची मदत मिळाली का? यावर अभिनेता म्हणाला, ‘इंडस्ट्रीतील काही लोकांनी आपापल्या परीने मदत केली…’ असं देखील अभिनेता म्हणाला.
मुलाखतीत अभिषेक बच्चन याचा नाव ऐकताच विवेक म्हणाला, ‘प्रचंड स्वीटहार्ट आहे… खरंच तो एक उत्तम व्यक्ती आहे…’ सलमान – ऐश्वर्याचं नाव ऐकताच विवेक म्हणाला, ‘देव भलं करो…’, रिलेशनशिपबद्दल अभिनेता म्हणाला, ‘एक काळ असा होता जेव्हा आजूबाजूला प्लॅस्टिकच्या हसणाऱ्या लोकांनी वेढलं होतं.’
‘त्या परिस्थितीतून बाहेर निघालो नसतो तर, स्वतः देखील प्लास्टिकच्या स्माईलचा झालो असतो.. आता मला लोकं ट्रोल देखील करतील. पण मला कसलीच काळजी नाही. मी माझ्या बाजूने स्पष्ट आहे. मला काय करायचं आहे मला माहिती आहे. शिवाय माझ्यासाठी काय गरजेचं आहे…’ हे देखील मला माहिती आहे… असं देखील अभिनेता म्हणाला.
स्वतःचा अनुभव सांगत विवेक म्हणाला, ‘मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे. कधी – कधी आपण वेदनादायी नात्यात असतो… काही नाती फक्त तुमचा वापर करतात. त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच किंमत नसते. तुम्हाला सन्मान मिळत नाही. अशा नात्यात तुम्ही देखील गुंतले जाता. कारण तुम्हाला तुमची किंमत माहिती नसते… कधीकधी तुम्हाला असं वाटतं की नशिबाला जे हवं आहे ते होईल परंतु तुम्ही तुमचा स्वाभिमान कधीही गमावू नये.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
सांगायचं झालं तर, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट झाला. विवेकने तर प्रेस कॉन्फ्रेंस घेत सलमान खानवर गंभीर आरोप केले होते.