World Cup 2023 : ‘संघ 10 सामने उत्तम खेळला, फायनल मात्र…’, पराभवानंतर अभिनेत्याकडून टीम इंडियावर प्रश्न उपस्थित

| Updated on: Nov 20, 2023 | 9:19 AM

World Cup 2023 : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने पराभवानंतर टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले अनेक प्रश्न, 'आजची सर्वात खराब कामगिरी...', सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना... सर्वत्र चर्चांना उधाण..

World Cup 2023 : संघ 10 सामने उत्तम खेळला, फायनल मात्र..., पराभवानंतर अभिनेत्याकडून टीम इंडियावर प्रश्न उपस्थित
Follow us on

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतील क्रिकेट संघाने सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर, फायनलसाठी भारतीयांच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप 2023 वर स्वतःचं नाव कोरलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्ल्ड कप 2023 ची चर्चा सुरु आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटी देखील वर्ल्ड कप 2023 वर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देत आहे. अभिनेका विवेक ओबेरॉय याने देखील ‘आजची सर्वात खराब कामगिरी…’ असं म्हणत एका व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे.

विवेक ओबेरॉय याने एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत निराशा व्यक्त केली आहे. अभिनेता म्हणाला, ‘ऑस्ट्रेलिया संघाने उत्तम कामगिरी केली हे महत्त्वाचं नाही. पण आपली खेळी फार सामान्य होती. आपल्या गोलंदाज आणि फलंदाजांनी गेल्या 10 सामन्यांमध्ये जी कामगिरी केला ती फायनलमध्ये दाखवली नाही.’

हे सुद्धा वाचा

 

 

पुढे अभिनेता म्हणाला, ‘भारतीय संघाची आजची कमागिरी सर्वात खराब होती. पण काही हरकत नाही… मी भारतीय क्रिकेट संघाचा चाहता आहे आणि राहिल… पुढील वर्ल्ड कप आहे….’ सध्या विवेक ओबेरॉय याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. नेटकरी अभिनेत्याच्या व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

वर्ल्ड कप 2023 भारताच्या पराभवानंतर सर्वत्र निराशेचं वातावरण आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त करत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताला पराभाव स्वीकारावा लागला आहे. सांगायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेक सेलिब्रिटी देखील स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना खान याच्यासोबतच , रणवीर सिंग, आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विवेक ओबेरॉय भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते.