अभिनेत्री ऐश्वर्या राय आता पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा ऐश्वर्या फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात आता पुढे निघून गेले असले तरी, भूतकाळामुळे चर्चेत असतात. ऐश्वर्याचा एक्स – बॉयफ्रेंड आणि अभिनेता विवेक ओबेरॉय याने काही दिवसांपूर्वी कोरियोग्राफर फराह खान हिला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या हिचं मन प्लास्टिकसारखं असं म्हणाला होता. अभिनेता असं का म्हणाला होता जाणून घेऊ…
विवेक म्हणाला, ‘एवढं सगळं झाल्यानंतर देखील ऐश्वर्या हिला माझे आभार मानावे असं वाटलं नाही. उलट मी बालीशपणा करत आहे. असं तिचं म्हणणं होतं. मला ऐश्वर्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. मला यामुळे मोठा धक्का बसला होता. माझ्या आयुष्यातील तो सर्वात मोठा धक्का होता.’
पुढे विवेक याने बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल देखील धक्कादायक वक्तव्य केलं, ‘प्लास्टिक कंपन्यांमध्ये जेवढं प्लास्टिक तयार होत नसेल, त्यापेक्षा जास्त प्लास्टिक बॉलिवूड इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीमधील लोकांच्या मनात आहे.’, रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं.
सांगायचं झालं तर, 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यों हो गया ना’ सिनेमात ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. तेव्हा ऐश्वर्या हिचं अभिनेता सलमान खान याच्यासोबच ब्रेकअप झालं होतं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्या आणि विवेक यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
जवळपास दोन ऐश्वर्या आणि विवेक यांनी एकमेकांना डेट केलं. पण एक दिवस विवेक याने पत्रकार परिषद घेतली आणि सलमान खान याच्यावर अनेक आरोप केले. याचा परिणाम ऐश्वर्या हिच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील झाला. ज्यामुळे ऐश्वर्या आणि विवेक यांचे मार्ग वेगळे झाले.
सलमान खान याच्यासोबत झालेल्या भांडणांमुळे विवेक याचं बॉलिवू़डमध्ये करियर देखील संपलं. ऐश्वर्या हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक याने प्रियंका अलवा हिच्यासोबत लग्न केलं. अभिनेता आता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर सलमान खान मात्र वयाच्या 58 व्या वर्षी देखील एकटाच आहे.
सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींना भाईजान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.