मुंबई- ‘वागळे की दुनिया- नई पिढी नये किस्से’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली. या कौटुंबिक कॉमेडी मालिकेचा आनंद सर्वच वयोगटातील प्रेक्षक घेतात. नुकतंच या मालिकेने 500 भाग पूर्ण केले आहेत. त्यानिमित्त त्यातील कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सुमीत राघवन, परीवा प्रणती, भारती आचरेकर, अंजन श्रीवास्तव, चिन्मयी साळवी, शीहान कपाही, मालिकेचे निर्माते जेडी मजेठिया आणि सोनी सबचे बिझनेस हेड नीरज व्यास यावेळी उपस्थित होते.
‘वागळे की दुनिया’ या मालिकेने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेप्रमाणेच लोकप्रियता मिळवली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यातील किस्से आणि समस्या यांवरून एपिसोडचं लेखन केलं जातं. त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मालिका आपलीशी वाटू लागली आहे.
Today we telecast the 500th ep of #WagleKiDuniya.
Congratulations to the entire cast and crew and a big thank you to the audiences.❤️❤️??@JDMajethia @KapadiaAatish@brutyful @Deepakpareek1 @AmitSoni2112 @sabtv #गणपतीबाप्पामोरया pic.twitter.com/FEWThgxILX— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) November 7, 2022
यासोबतच मालिकेतून आयुष्यातील महत्त्वपूर्ण धडेही शिकायला मिळतात. त्यामुळे कुटुंबातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत.. प्रत्येकालाच ही मालिका आवडू लागली. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या या प्रेमामुळेच मालिकेने 500 भागांचा टप्पा गाठला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबाचं वास्तववादी चित्रण, रोजच्या जीवनातील छोट्या-मोठ्या समस्या, कलाकारांचं दमदार अभिनय आणि प्रत्येक एपिसोडमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनातील खरी वाटणारी परिस्थिती यांमुळे मालिकेला यश मिळत गेलं. विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच या मालिकेतून महत्त्वपूर्ण शिकवणसुद्धा मिळत गेली.