मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं योगदान फार मोठं आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. वहिदा रहमान यांनी ६० – ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वहिदा रहमान यांची चर्चा रंगत आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहिदा रहमान यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी वहिदा रहमान यांनी खास व्यक्तीच्या आठवणीत भावना व्यक्त केल्या..
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वहिदा रहमान म्हणाल्या, ‘भारत सरकारने या सन्मानासाठी माझी निवड केली म्हणून मी आनंदी आहे. पण माझे आवडते सहकलाकार दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या १०० व्या वाढदिवसाच्या दिवशी पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मी आनंदी आहे.. यापेक्षा चांगला दुसरा दिवस असू शकत नाही…’
पुढे वहिदा रहमान म्हणाल्या, ‘मी माझ्या चाहत्यांचे आभार मानते.. ज्यांनी पूर्ण करियरमध्ये माझ्यावर प्रेम केलं. आज देखील चाहते माझा आदर करतात…’ एवढंच नाही तर, वहिदा रहमान यांनी देव, चाहते, मित्र आणि कुटुंब सर्वांचे आभार मानले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वहिदा रहमान यांची चर्चा रंगत आहे.
वहिदा रहमान यांनी 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सीआयडी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. देव आनंद देखील सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमाचं दिग्दर्शन राज खोसला यांनी केलं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर वहिदा रहमान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
वहिदा रहमान यांनी करियरमध्ये गुरु दत्त यांच्यापासून अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘गाइड’, ‘नील कमल’, ‘तीसरी कसम’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘राम और श्याम’ यांसारख्या सिनेमे बॉलिवूड दिले आहेत..
वहिदा रहमान यांनी अनेक हिंदी, तामिळ, तेलुगू, आणि बंगाली सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, २ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, ‘वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो.’ सध्या सर्वत्र अनुराग ठाकूर यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.