नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप ; सर्वत्र खळबळ

| Updated on: Jan 21, 2023 | 11:11 AM

अभिनेत्रीच्या डान्स आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात घर केलेली सीरिज अभिनत्यामुळे वादाच्या भोवऱ्यात ; अभिनेत्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप

नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप ; सर्वत्र खळबळ
नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप ; सर्वत्र खळबळ
Follow us on

मुंबई : नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज ‘वेन्सेडे’ (wednesday) आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. हॉलिवूड अभिनेत्री जेना ओर्टेगा हिने ‘वेन्सेडे’ सीरिजमध्ये भन्नाट भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य कलं. तिच्या अभिनयाचं आणि डान्सचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. सीरिजमधील अभिनेत्रीचं कौतुक होत असताना, एका अभिनेत्याला सीरिजमधून काढून टाकण्याची मागणी चाहत्यांकडून होत आहे. सीरिज ‘वेन्सेडे’ मध्ये झेव्हियर या भुमिकेला न्याय देणारा अभिनेता पर्सी हायन्स व्हाइट याला सीरिजमधून काढून टाकण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

मिळालेल्या महितीनुसार, ट्विटरवर एका युजरने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. ट्विटमध्ये युजरने अभिनेता आणि त्याच्या मित्रांवर गंभीर आरोप लावले आहेत. युजरने सांगितल्यानुसार, ‘पर्सी हायन्स व्हइट आणि त्याचे मित्र अशा महिलांना भेटायला बोलवायचे ज्या दिसायला सुंदर आहेत. त्यानंतर त्यांना अंमली पदार्थ देवून त्यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न ते करायचे.’ महिलेच्या गंभीर आरोपांनंतर अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

 

 

पर्सी हायन्स व्हइट याच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर इतर महिलांनी देखील त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत अभिनेत्याला सीरिजमधून काढण्याची मागणी केली आहे. अभिनेत्यावर अनेक महिलांनी गंभीर आरोप केल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्स पर्सी हायन्स व्हइट याचा विरोध करत आहेत.

 

 

गंभीर आरोपांवर पर्सी हायन्स व्हइट अद्यापही गप्प

गंभीर आरोपांवर पर्सी हायन्स व्हइट याने अद्यापही कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. आतापर्यंत अभिनेत्याविरोधात पोलीस तक्रार देखील झालेली नाही. अशात अभिनेत्यावर कोणती कारवाई देखील झालेली नाही. अनेक महिलांनी गंभीर आरोप लावल्यानंतर अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे.