मुंबई : दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याविषयी अधिकाधिक जनजागृती केली जातेय. नुकतंच अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या एका पोस्टमध्ये हार्ट अटॅकचा खुलासा केला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजियोप्लास्टी झाल्याची आणि स्टेंट लागल्याची माहिती तिने दिली. या पोस्टनंतर स्त्रियांच्या हृदयाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आणखी वाढली. अशातच डॉक्टर पलानीअप्पन मणिकम (एमडी, एमपीएच, इंटर्नल मेडिसीन, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि एपिडेमियोलॉजिस्ट) यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत हार्ट अटॅकच्या कारणांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या व्हिडीओमध्ये त्यांनी सुष्मिता सेनच्या हार्ट अटॅकविषयी आणि त्यामागील कारणांविषयी सविस्तर भाष्य केलं. डॉ. मणिकम यांनी स्पष्ट केलं की जेव्हा इन्सुलिन (स्वादुपिंडाद्वारे स्रावित केला जाणारा हार्मोन, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो आणि ऊर्जेच्या स्वरुपात साखर शोषून घेण्यासाठी पेशींची मदत करतो.) योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा हार्ट अटॅकचा धोका असतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल आणि दीर्घकाळ लठ्ठपणा होऊ शकतो.
लठ्ठपणामुळे रक्तवाहिन्यांच्या बाजूने चरबी जमा होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. मात्र हार्ट अटॅकमागील आणखी एक महत्त्वपूर्ण कारण अनेकदा गांभीर्याने घेतलं जात नाही. ते म्हणजे तणाव.
या व्हिडीओमध्ये डॉ. मणिकम यांनी स्पष्ट केलं की “कॉर्टिसॉल हे हृदयाच्या आरोग्यासाठी इन्सुलिनइतकंच हानिकारक असतं. स्ट्रेस हार्मोन जेव्हा वाढतात, तेव्हा इन्सुलिन प्रतिकारासारखीच समस्या निर्माण होऊ शकते. दुर्दैवाने लहान रक्तवाहिन्यांमुळे भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. त्यामुळे तणावाचं नीट व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.”
व्हिडिओमध्ये, डॉ मणिकम यांनी उघड केले की जेव्हा हृदयाच्या आरोग्यासाठी कॉर्टिसॉल इन्सुलिनसारखेच हानिकारक आहे. तणाव संप्रेरक, जेव्हा ते जास्त असते, तेव्हा इन्सुलिनच्या प्रतिकारासारख्या समस्या उद्भवू शकतात. आणि दुर्दैवाने, लहान रक्तवाहिन्यांमुळे भारतीयांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन नीट करणे अत्यावश्यक आहे.
पोटाजवळ अधिक चरबी असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत.
– चांगल्या दर्जाचं इन्सुलिन मिळवणं
– कॉर्टिसॉलची पातळी कमी राहील याची काळजी घेणं
– रात्रीचं जेवण लवकर करणं (संध्याकाळी 7 वाजेपर्यंत)
– उशिरा खाणं आणि कोणत्याही प्रकारचे रात्रीचे स्नॅक्स टाळावेत
– पुरेशी 7 तासांची झोप घ्यावी
टीप- या लेखात नमूद केलेले टिप्स आणि सूचना या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेल्या आहेत. त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ घेऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.