नवी दिल्ली : 24 फेब्रुवारी 2024 | भारतातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या जागतिक शिखर परिषदेच्या दुसऱ्या सिझनला लवकरच सुरुवात होणार आहे. रविवारी 25 फेब्रुवारी 2024 पासून हा भव्य कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून त्यात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होमार आहेत. येत्या 27 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून त्यात विविध सेलिब्रिटी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडतील. यंदाच्या सिझनची थीम ‘इंडिया : पॉइज्ड फॉर द नेक्स्ट बिग लीप’ अशी आहे. या कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री रवीना टंडन, निर्माते आणि अभिनेते शेखर कपूर, बासरीवादक राकेश चौरसिया यांसारखे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. ‘विकी डोनर’, ‘ड्रीम गर्ल’, ‘अंधाधून’, ‘बाला’ यासारख्या विविध विषयांच्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता आयुषमान खुरानासुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
जवळपास गेल्या दहा वर्षांपासून आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता आयुषमान खुराना हा टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित राहणार आहे. या कॉन्क्लेव्हमधील विशेष सेगमेंट ‘फायरसाइड चॅट- सिनेमा फॉर अ न्यू इंडिया’मध्ये तो दिसणार आहे. या सेगमेंटमध्ये तो त्याच्या करिअरविषयी बोलणार आहे. आयुषमानचा हा खास सेगमेंट कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहे. दुपारी 1.20 वाजता या विशेष सेगमेंटची सुरुवात होईल.
आयुषमान खुरानाने 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी त्याला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याने ‘बेवकूफियाँ’, ‘हवाईजादा’, ‘नौटंकी साला’ आणि ‘मेरी प्यारी बिंदू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘अंधाधून’ चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. ‘आर्टिकल 15’, ‘बाला’, ‘ड्रीम गर्ल’, ‘ड्रीम गर्ल 2’, ‘डॉक्टर जी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. आयुषमान हा उत्तम गायकसुद्धा आहे.