Kantara: ‘कांतारा’चा नेमका अर्थ काय? देशभरात का होतेय चित्रपटाची एवढी चर्चा?

| Updated on: Oct 28, 2022 | 1:50 PM

Kantara: बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत 'कांतारा'ची क्रेझ; चित्रपटात असं नेमकं आहे तरी काय?

Kantara: कांताराचा नेमका अर्थ काय? देशभरात का होतेय चित्रपटाची एवढी चर्चा?
Kantara
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कांतारा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास महिना होत आला आहे. अद्याप बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ धुमाकूळ घालतोय. अनेकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘कांतारा’ म्हणजे नेमकं काय, असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. या शब्दाचा अर्थ आणि चित्रपटाविषयी काही खास माहिती जाणून घेऊयात..

‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे.

कर्नाटकमध्ये या वनदेवतेला खूप महत्त्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केले जातात. कांतारा चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टीने मुख्य भूमिका साकारली आहे. त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्याची पटकथासुद्धा लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

कांतारा हा चित्रपट सर्वांत आधी कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. जेव्हा या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळू लागला, तेव्हा इतर भाषांमध्ये त्याचं डबिंग करण्यात आलं. त्यामुळे हिंदी भाषेत हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. ऋषभ शेट्टीला आपल्या मूळ भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित करायचा होता.

या चित्रपटाचा बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर आता त्याने जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘कांतारा’ची वेगळी कथा आणि त्याचं सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. नेहमी दाखवण्यात येणाऱ्या त्याच त्याच कथांपेक्षा अत्यंत वेगळी अशी ‘कांतारा’ची कथा आहे आणि हेच या चित्रपटाच्या यशामागचं मुख्य कारण आहे.