अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता, जेव्हा सलमान – शाहरुख एकमेकांचं तोंड देखील पाहत नव्हते. पण आता अनेक ठिकाणी दोन खास मित्र कायम एकत्र दिसतात. शाहरुख खान याच्या कुटुंबियांसोबत देखील सलमान खान याचे चांगले संबंध आहेत. शाहरुख – सलमान फक्त चांगले मित्र नाहीतर, भाऊ देखील आहेत. शाहरुख माझा भाऊ आहे… असं सलमान अनेकदा बोलताना दिसतो. दोघांमध्ये शाहरुख खान मोठा आहे. दोघांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
शाहरुख खान एकदा म्हणाला होता की, ‘जेव्हा माझ्या किंवा माझ्या कुटुंबावर कोणतं संकट येईल तेव्हा सलमान खान माझ्यासोबत असेल…’ आणि तसं झालं देखील. जेव्हा किंग खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकला होता. तेव्हा सर्वात आधी किंग खानच्या मदतीला सलमान खान आला होता. शिवाय सलमान खान याची आई – वडील देखील आर्यन याच्यासाठी प्रर्थना करत होते.
सलमान खान आणि आर्यन खान यांच्यामध्ये देखील चांगले संबंध आहेत. जेव्हा सलमान, आर्यन भेटतो तेव्हा त्याची मस्करी करतो. सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांच्या कल्चर सेंटर लॉन्च कार्यक्रमात देखील आर्यन आणि सलमान खान भेटले, तेव्हा सलमान याने किंग खानच्या कुटुंबियांना थांबवलं आणि फोटो काढण्यास सांगितलं. शिवाय तेव्हा आर्यन याने सलमान खान याला ‘भाई’ म्हणून हाक मारली होती.
रिपोर्टनुसार, सलमान खान याचं ‘मन्नत’ बंगल्यासोबच भावनिक नातं आहे. सलमान खान कायम ‘मन्नत’ बंगल्यात येत जात असतो. एका मुलाखतीत, सलमान म्हणाला होता की, ‘मी मन्नत बंगला विकत घेणार होतो. पण माझे वडील म्हणाले एवढ्या मोठ्या घराचं तू काय करणार आहेत. आता मी शाहरुखला विचारतो एवढ्या मोठ्या घराचं काय करतो…’
आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, आर्यन खान याला अभिनयात रस नाही. आर्यन याने फाईन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स, टीव्ही प्रॉडक्शनमध्ये डिग्री घेतली आहे. शिवाय आर्यन खान याने स्वतःची क्लोदिंग कंपनी देखील सुरु केली आहे. लेकाच्या कंपनीच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान याने देखील मेहनत घेतली होती.