Sara Ali Khan | ‘त्या दिवशी आईला गोळी लागली असती…’, सारा अली खान हिचा मोठा खुलासा

| Updated on: Apr 12, 2024 | 3:50 PM

Sara Ali Khan | त्या दिवशी असं काय झालं असतं, ज्यामुळे सारा अली खान हिच्या आईला लागली असती गोळी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या वक्तव्याची चर्चा... सारा कायम तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि आई - वडिलांच्या नात्याबद्दल सांगत असते...

Sara Ali Khan | त्या दिवशी आईला गोळी लागली असती..., सारा अली खान हिचा मोठा खुलासा
Follow us on

अभिनेत्री सारा अली खान कायम तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी चाहत्यांना सांगत असते. अभिनेत्री फक्त तिच्या रिलेशनशिपबद्दलच नाहीतर, आई – वडिलांच्या नात्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सांगायचं झालं तर, सारा लहान असताना अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर एकट्या अमृता हिने दोन मुलांचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ केला. अभिनेत्री म्हणते, अमृता – सैफ प्रचंड खोडकर होते… एका मुलाखतीत खुद्द सारा हिने आई – वडिलांबद्दल मोठं सत्य सांगितलं होतं.

एका मुलाखतीत सारा म्हणाली, ‘आई – वडिलांनी चेहऱ्यावर बूट पॉलिश लावून त्यांच्या मित्रांसोबत प्रँक करण्याची योजना केली होती. ऐन वेळी माझ्या वडिलांना आईला मित्रांच्या खोलीत ढकललं आणि खोलीचा दरवाजा लावून घेतला…’ रिपोर्टनुसार, ती खोली सैफ – अमृता यांची मैत्रीण नीलू मर्चंट यांचा होता.

सारा हिची आई खोलीत होती त्या खोलीमध्ये नीलू त्यांच्या पतीसोबत आराम करत होत्या… तेव्हा नीलू यांच्या पतीने माझ्या आईवर गोळ्या झाडल्या असत्या… पण आईने पटकन स्वतःचे दोन्ही हात वर केले आणि ओरडली गोळी नको मारू मी डिंगी आहे…’ हा भयानक किस्सा खुद्द सारा हिने एका मुलाखतीत सांगितला होता.

हे सुद्धा वाचा

सारा कायम तिच्या आई – वडिलांबद्दल बोलताना दिसते. सांगायचं झालं तर, सैफ अली खान याच्या दुसऱ्या कुटुंबासोबत देखील सारा आणि इब्राहिम यांचे चांगले संबंध आहेत. सारा हिची सावत्र आई आणि अभिनेत्री करीना कपूर देखील सारा हिच्याबद्दल अनेक गोष्ट बोलत असते.

सैफ अली खान – करीना कपूर खान यांच्या घरी देखील सारा आणि इब्राहिम यांचं येणं – जाणं असतं… एवढंच नाहीतर, सैफच्या चारही मुलांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. करीना देखील सारा आणि इब्राहिम यांच्याबद्दल चाहत्यांना सांगत असते.

सारा सध्या ‘ए वतन मेरे वतन’  आणि ‘मर्डर मुबारक’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. सारा  सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.