चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई

| Updated on: May 09, 2024 | 5:29 PM

चित्रपटात जोपर्यंत काम मिळत तोपर्यंत कोणत्याही कलाकाराला कसलीच चिंता नसते. पण जेव्हा काम मिळणं बंद होतं तेव्हा सर्वात मोठी अडचण असते ती आर्थिक गोष्टींची. पण काही कलाकारांनी आधीच याची सोय करुन ठेवलेली असते. त्यांनी आधीच पैसे गुंतवलेले असतात.

चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई
Follow us on

Actor Govinda Income : गोविंदा हा बॉलीवूडचा मोठा अभिनेता आहे. ज्याने 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केले. त्या काळात गोविंदाचे चित्रपट चित्रपटगृहात देखील खूप चालायचे. तो रातोरात सुपरस्टार झाला. गोविंदाच्या घरासमोर दिग्दर्शक आणि निर्मात्यांची मोठी रांग लागायची. गेल्या अनेक वर्षात अनेकांनी गोविंदाची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणालाच जमले नाही. गोविंदाची जागा इतर कोणत्याही व्यक्तीला इंडस्ट्रीत घेता आलेली नाही. गोविंदा सध्या चित्रपटांमध्ये काम करत नाहीये. त्यामुळे आता त्याचा घरखर्च कसा चालतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांना जोपर्यंत चित्रपट मिळतात तो पर्यंत त्यांना कोणतीही चिंता नसते. पण जेव्हा चित्रपट मिळणं बंद होतं तेव्हा मात्र त्यांना घरखर्च काढणं अवघड होऊन जातं. यामुळे अनेक जण डिप्रेशनमध्ये देखील जातात. अनेकांना काम मिळत नसल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशी अनेक उदाहरणे आहेत.

गोविंदाची संपत्ती किती?

अनेक स्टार्सने करिअर शिखरावर असताना इतर क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी त्यांच्या कमाईचा काही भाग प्रॉपर्टीमध्ये गुंतवला आहे. रिपोर्ट्सनुसार, गोविंदाकडे 160 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मुंबईसारख्या शहरात गोविंदाची तीन घरे आहेत. इतकंच नाही तर अमेरिकेतही त्याची प्रॉपर्टी आहे. याशिवाय रायगडमध्ये त्याचे फार्महाऊसही आहे.

गोविंदाचे एक घर मुंबईतील जुहूमध्ये आहे, तर दुसरे घर मड आयलंडमध्ये आहे. त्याचे तिसरे घरही जुहू येथे आहे. गोविंदाचे हॉटेल आणि इतर व्यवसायही आहेत, ज्यामधून तो करोडो रुपये कमावतो. कोणत्याही चित्रपटासाठी तो सुमारे ५ कोटी रुपये घेतो.

गोविंदा कशी करतो कमाई

रिपोर्ट्सनुसार, गोविंदाची मासिक कमाई 1 कोटी रुपये आहे आणि वार्षिक कमाई 12 कोटी रुपये आहे. गोविंदा ब्रँड एंडोर्समेंट आणि रिॲलिटी शोमधूनही कमाई करतो. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून गोविंदाने आपले आणि मुलांचे भविष्य सुरक्षित केले आहे.

गोविंदाने राजकारणात देखील पाऊल ठेवले होते. त्याने भाजपचे राम नाईक यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. 2004 ते 2009 या काळात तो खासदार होता. गोविंदाने मुंबई उत्तर मतदारसंघातून 50,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. १४ वर्षानंतर गोविंदाने पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या तो शिवसेनेचा प्रचार करत आहे.