मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील बिग बी यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. ज्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत होते. पण १९८२ साली जेव्हा ‘कुली’ सिनेमाची शुटिंग सुरु होती, तेव्हा देखील ॲक्शन सीन शुट करताना बिग बींना जखमी झाले होते. तेव्हा अमिताभ बच्चन यांची प्रकृतीमध्ये सुधार होण्यासाठी मोठा काळ लागला. तेव्हा बिग बी यांची प्रकृती चिंताजनक होती.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बिग बी यांची प्रकृती गंभीर आहे… असं सांगितलं आणि कुटुंबासह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. अमिताभ बच्चन यांना आता प्रार्थनेची गरज आहे… असं देखील डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं. तेव्हा आयसीयूमध्ये एक चमत्कार झाला होता. याबद्दल खुद्द जया बच्चन यांनी सांगितलं होतं.
जया बच्चन यांनी सांगितलं की, ‘अमिताभ बच्चन यांची प्रकृती नाजूक होती. त्या दिवशी आणि त्याच वेळी आणखी एका व्यक्तीने आयसीयूमध्ये अखेरचा श्वास घेतला. आयसीयूमधील व्यक्ती आणि बिग बी यांचा जन्म दिवस एकच होता….’ एवढंच नाही तर, तेव्हा जया बच्चन रुग्णालयात हनुमान चालिसा घेवून पोहोचल्या होत्या असं देखील अनेकदा समोर आलं..
‘कुली’ सिनेमाची शुटिंग सुरु होती तेव्हा, अमिताभ बच्चन आणि पुनील यांच्यामध्ये मारामारीचा सीन होता. तेव्हा बिग बी यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हा ‘कुली’ सिनेमासोबत अभिनेता जॅकी श्रॉफ स्टारर ‘हीरो’ सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता. दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
बिग बी यांच्या आगामा सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’, ‘प्रोजेक्ट K’, ‘बटरफ्लाय’, ‘खाकी 2’ या सहा सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘गणपत’, ‘घूमर’, ‘द उमेश क्रॉनिकल्स’ या सिनेमांमध्ये बिग बी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे…