अरहान खान हा अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा मुलगा असल्यामुळे कायम चर्चेत असतो. रहान खान याने नुकताच त्याच्या करियरला सुरुवात केली आहे. अरहान याने पॉडकास्ट विश्वात पदार्पण केलं आहे… सध्या अरहान पॉटकास्ट ‘डम्ब बिरयानी’ मुळे तुफान चर्चेत आहे. ‘डम्ब बिरयानी’ चा पहिला एपिसोड 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर देखील अरहान ‘डम्ब बिरयानी’ चे व्हिडीओ पोस्ट करत असतो. आता देखील अरहान याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अरबाज खान, अरहान आणि त्याच्या मित्रांना रिलेशनशिपचे सल्ले देताना दिसत आहे.
नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरहान खान ब्रदर्सबद्दल बोलताना दिसत आहे. गंभीर विषयावर चर्चा सुरु असताना जोक्समुळे वातावरण आनंदी होतं अरहान त्याचे वडील अरबाज याला विचारतो, ‘तुम्ही तुमच्या खोलीला बरमूडा ट्रायंगल का म्हणता…’ यावर सोहेल खान यांने डेटिंगचा किस्सा सांगितला..
पुढे अरबाज याने भाई अरबाज आणि सोहेल यांच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘आम्ही तीन भावांमध्ये फार घट्ट नातं आहे…’ अरबाज याचं वाक्य पूर्ण करत सोहेल म्हणतो, ‘जगाला वाटतं आम्ही तिघे बहिणी आहोत…’ सध्या सर्वत्र अरहान याच्या पॉडकास्टची चर्चा सुरू आहे.
अरहान याचा मित्र देव म्हणतो, ‘रिलेशनशिपमध्ये मी कायम गोंधळलेला असतो… भावनांना अधिक महत्त्व देऊ की विचारांना कळत नाही…’ यावर अरबाज म्हणतो, ‘अशा वेळी शारीरिक संबंध ठेवावे…’ अरबाज याचा सल्ला ऐकून प्रत्येक जण पोट धरुन हसू लागतो… सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
अरहान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, मलायका आणि अरबाज यांचा मुलगा असल्याामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे. अराहन याचा जन्म 2002 मध्ये झाला. त्याने अमेरिकेतून फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. एवढंच नाहीतर, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या अनेक प्रोजेक्टमध्ये अरहान याने असिस्ट केलं आहे. अरहान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील असतो चर्चेत…