अभिनेत्रीने 16 व्या वर्षी 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत उकरलं लग्न, म्हणाली, ‘लग्नानंतर आयुष्यातून आनंद…’

| Updated on: Mar 07, 2025 | 2:50 PM

अभिनेत्रीने 16 व्या वर्षी 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत उकरलं लग्न, लग्नानंतर खडतर झालं अभिनेत्रीचं आयुष्य... पती सिगारेटचे द्यायचा चटके, मध्यरात्री घरातून काढायचा बाहेर…! जाणून व्हाल थक्क...

अभिनेत्रीने 16 व्या वर्षी 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत उकरलं लग्न, म्हणाली, लग्नानंतर आयुष्यातून आनंद...
फोटो सौजन्य - फाईल फोटो
Follow us on

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर यश मिळालं. पण खासगी आयुष्यात त्यांना चढ-उतारांचा सामना करावा लागला. असंच काही लोकप्रिय अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत देखील झालं. डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमानंतर डिंपल यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील हीट ठरला. पहिल्याच सिनेमानंतर डिंपल यांना अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. पण अनेक सिनेमांना अभिनेत्रीने नकार दिला. त्याचं कारण फार कमी लोकांना माहिती आहे.

एकापेक्षा एक सिनेमात काम केल्यानंतर डिंपल यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना डिंपल यांची ओळख अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत झाली. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केलं. डिंपल यांनी जेव्हा राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं तेव्हा त्या फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि राजेश खन्ना त्यांच्यापेक्षा 15 वर्ष मोठे होते.

लग्नानंतर डिंपल कपाडिया यांनी अभिनयाचा निरोप घेतला आणि संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला. लग्नानंतर डिंपल यांनी पहिली मुलगी ट्विंकल खन्ना हिला 1973 मध्ये जन्म दिला. त्यानंतर 1977 मध्ये रिंकी हिला जन्म दिला. मुलींच्या जन्मानंतर देखील राजेश आणि डिंपल यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

हे सुद्धा वाचा

1982 मध्ये राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. डिंपल यांनी सांगितल्यानुसार, प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारसोबत लग्न करणं ही सर्वात मोठी चुकी होती… दोघांमधील वाद टोकाला पोहोचल्यानंतर अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीत डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होती. ‘ज्या दिवशी माझं लग्न राजेश खन्ना यांच्यासोबत झालं, त्याच दिवशी माझ्या आयुष्यातील आनंद नष्ट झाला. राजेश खन्ना वाईट अवस्थेत होते. तेव्हा त्यांनी मला मारहाण देखील केली. त्यांच्या मनात राग इतका होता की, त्यांनी मला सिगारेटचे चटके देखील दिले..’ अशा अनेक चर्चा रंगल्या. पण राजेश खन्ना यांच्या निधनानंतर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला.