जेव्हा बोनी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधावर अर्जुनच्या आईने सोडलं मौन; म्हणाल्या “हे जग फार निर्दयी..”

| Updated on: Aug 15, 2024 | 9:27 AM

"माझी मुलं माझ्यासोबत राहतात, पण ते त्यांच्या वडिलांच्याही जवळ आहेत. त्यांच्यासोबत ते फिरतात, जेवतात. मला त्या व्यक्तीशी शत्रुत्व किंवा द्वेष नाही. माझ्या मुलांना मी त्यांच्यापासून दूर केलं तर ते खूप निर्दयी असतं. कारण मी पित्याची जागा घेऊ शकत नाही", असंही त्यांनी सांगितलं होतं.

जेव्हा बोनी कपूर यांच्या विवाहबाह्य संबंधावर अर्जुनच्या आईने सोडलं मौन; म्हणाल्या हे जग फार निर्दयी..
मोना शौरी, बोनी कपूर आणि श्रीदेवी
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच चढउतार आले होते. दोन मुलांचा पिता असून एका हिरोइनसोबत त्यांचं अफेअर असणं ही बाब अनेकांसाठी धक्कादायक होती. बोनी यांची पहिली पत्नी मोना शौरीला या घटनेनं मोठा धक्का बसला होता. आईला अशा परिस्थितीत पाहून अर्जुन आणि अंशुला यांच्या नजरेतही वडील बोनी आणि सावत्र आई श्रीदेवी हे गुन्हेगार ठरले होते. मोना आणि श्रीदेवी आता या जगात नाहीत. सोशल मीडियावर बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांची एक मुलाखत आहे, ज्यामध्ये त्या पतीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत.

मोना यांनी 2007 मध्ये बोनी कपूर यांच्यासोबतच्या अयशस्वी लग्नाबद्दल वक्तव्य केलं होतं. फरहाना फारुक यांना दिलेल्या मुलाखतीत मोना म्हणाल्या, “बोनी कपूर यांच्यासोबत माझं अरेंज मॅरेज होतं. ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. लग्नाच्या वेळी मी फक्त 19 वर्षांची होती. त्यामुळे मी त्यांच्यासोबतच मोठी झाले, असं म्हणायला हरकत नाही. आमच्या लग्नाला 13 वर्षे झाली होती. जेव्हा मला समजलं की माझ्या पतीचं दुसऱ्या महिलेवर प्रेम आहे, तेव्हा माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.”

हे सुद्धा वाचा

“पतीचं दुसरं नातं ही एक अशी गोष्ट होती, ज्याबद्दल मी फक्त ऐकलं आणि वाचलंच होतं. पण जेव्हा प्रत्यक्षात माझ्यासोबत ते घडलं, तेव्हा माझ्यासाठी ते लग्न संपुष्टात आलं होतं. माझ्यासाठी माझा आत्मसन्मान सर्वांत मोठा आहे. प्रेम त्यानंतर येतं. जसजसा काळ जातो, तसतसं बदलाची गरज जाणवते. म्हणूनच बोनी यांना माझी नाही तर दुसऱ्या महिलेची गरज होती. आमच्या नात्याला दुसरी संधी देण्यासाठी काही राहिलंच नव्हतं. कारण श्रीदेवी गरोदर होती”, असं त्या पुढे म्हणाल्या.

मुलांवर झालेल्या परिणामाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “अर्जुन आणि अंशुलासाठीही तो काळ खूप कठीण होता. तेव्हा दोघं शाळेत शिकत होते. हे जग फार निर्दयी आहे. जेव्हा तुमची वेळ वाईट असते, तेव्हा लोक तुमच्याबद्दल चर्चा करू लागतात. माझ्या मुलांना शाळेतील इतर मुलांकडून त्रास सहन करावा लागला. मात्र ते आणखी मजबूत बनले आणि सत्याचा सामना करायला शिकले. आम्हा सर्वांना वेदनेच्या धागेनं एकत्र बांधलं होतं.”


“माझ्या कुटुंबात माझे वडील, आई आणि बहीण होती. त्या सर्वांनी मला खूप साथ दिली. ते म्हणाले तू रड, तुझ्या जखमांवर मलम लाव, वैराग्य स्वीकार किंवा हिमालयात जा.. आम्ही सदैव तुझ्यासोबतच राहणार. अपमान फार वेदनादायी होता कारण माझी स्पर्धा एका हिरोइनशी होती. इंडस्ट्रीतल्या इतर महिला मला सल्ला द्यायच्या की तू तुझं वजन का कमी करत नाही? तू स्पा जॉईन का करत नाही? हे सर्व ऐकून मला या गोष्टीची जाणीव झाली की मला पुन्हा उठून उभं राहायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. माझी मैत्रीण मीना गोकुलदासच्या आईने मला एक सल्ला दिला होता, जे माझ्यासाठी एकमेव सत्य बनलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, जर एखाद्याच्या आयुष्यात तुमच्यासाठी कोणतीच जागा नसेल, तर तुमच्याही आयुष्यात त्या व्यक्तीसाठी जागा नसायला पाहिजे. माझ्यासाठी ही आकाशवाणी होती. मला हे समजलं होतं की मी अपयशी ठरले नाही तर माझं नातं अपयशी ठरलं होतं”, अशा शब्दांत मोना यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.