1 – 2 नाही कतरिनाने ‘या’ अभिनेत्याला लगावल्या 20 कानशिलात, तेव्हा अभिनेत्रीचं झालं समाधान

| Updated on: Feb 12, 2025 | 6:29 PM

Katrina Kaif: अभिनेत्यासोबत असं काय झालं होतं, ज्यामुळे कतरिना त्याला लगावल्या 20 कानशिलात, त्यानंतर अभिनेत्रीचं झालं समाधान, करतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

1 - 2 नाही कतरिनाने या अभिनेत्याला लगावल्या 20 कानशिलात, तेव्हा अभिनेत्रीचं झालं समाधान
Follow us on

अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चहात्यांच्या मनावर आणि बॉलीवूडवर राज्य केलं. कतरिना कैफ हिने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. एवढंच नाही तर बॉलीवूडच्या तीन खान यांच्यासोबत देखील कतरीना कैफ हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये करिअर करत असताना कतरिना सोबत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या अनेक वर्षानंतर समोर आल्या. तिच्या आयुष्या असाच एक किस्सा आज जाणून घेवू. जेव्हा कतरिना हिने प्रसिद्ध अभिनेत्याला 1-2 नाही तर, 20 कानशिलात लगावल्या.

हा किस्सा आहे 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ सिनेमातला. सिनेमात कतरिना हिने अभिनेता इमरान खान आणि पाकिस्तानी अभिनेता अली जफर याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमा प्रदर्शित होऊन 14 वर्ष झाली आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास यांनी केलं आणि सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली.

दरम्यान, एका मुलाखतीत कतरिना हिने सिनेमातील सीनबद्दल सांगितलं. ‘सिनेमात मला इमरान खान याला कानशिलात मारायची होती. पण माझ्यासाठी ते फार कठीण होतं. सीन शूट होत होता, पण माझ्याकडून सीन काही हवा तसा होत नव्हता.’

‘सीनमध्ये मी आणि इमरान आमने सामने होतो… पण माझे प्रयत्नच सुरु होते. जोपर्यंत सीन चांगला होत नाही, तोपर्यंत मला तो सीन करायचा होता. असं करताना मी इमरानच्या 20 वेळा कानशिलात लगावल्या. तेव्हा इमरानची प्रचंड वाईट अवस्था झाली होती. पण अखेर तो सीन परफेक्ट झाला आणि एक न विसरता येणारी आठवण सोबत राहिली.’ असं कतरिना म्हणाली.

‘मेरे ब्रदर की दुल्हन’ हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा होता. अली अब्बास जफरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. सुरुवातीला इमरान खानला हा सिनेमा करायचा नव्हता, मात्र नंतर त्याने होकार दिला आणि हा सिनेमा खूप हिट ठरला.

इमरान आणि कतरिना यांच्या जोडीला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. कतरिना कैफच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिचा शेवटचा सिनेमा ‘मेरी ख्रिसमस’ होता. यामध्ये ती विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती.