मुंबई | 18 मार्च 2024 : टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) याला कोणी ओळखत नाही हे शक्य नाही. जगभरात किली पॉल याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. किली पॉल याचं बॉलिवूडच्या गाण्यांवर असलेलं प्रेम सर्वांना माहिती आहे. पण आता किली पॉल मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला आहे, किली पॉल याने मराठी गाण्यावर डान्स नाहीतर, चक्क गाणं गायलं आहे. ‘गुलाबी साडी’ गाणं गात किली पॉल याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त किली पॉल याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. संजू राठोड व प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने किली पॉल याला वेडं लावलं आहे. किली पॉल याच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात.
सांगायचं झालं तर किली पॉल कायम भारतीय गाण्यांवर लिपसिंक करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांकडून प्रेम देखील मिळतं. किली पॉलचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.
किलीचे सोशल मीडियावर जवळपास 8.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. किली अनेकदा भारतात देखील आला आहे. बिग बॉसमध्ये देखील पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. किली कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो.
किली पॉल सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.