दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती नाग चैतन्य अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नाग चैतन्य त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जरी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलत नसला तरी अनेकदा त्याने वादग्रस्त विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या ‘रेडिट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाग चैतन्यचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नात्यातील फसवणुकीबाबत मांडलेलं मत पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शैलजा रेड्डी अल्लुडू’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नाग चैतन्यने ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की त्याने कधी एकाच वेळी दोघींना डेट केलंय का? याच मुलाखतीत त्याची सहअभिनेत्री अनु इम्यॅनुअलसुद्धा उपस्थित होती. तिने त्यावर नकारार्थी उत्तर दिलं होतं. पण नाग चैतन्यने मात्र ‘होय’ असं म्हटलंय. “प्रत्येकाने आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. अशानेच तुमची प्रगती होते आणि तुम्ही ठरवू शकता की, ठीक आहे मी सर्व अनुभव घेतले आहेत आणि आता कुठेतरी स्थिरावण्याची वेळ आली आहे”, असं तो पुढे म्हणतो.
Naga Chaitanya admits to Cheating in the past, says “Everyone should experience everything!”
byu/Significant-Neat-142 inBollyBlindsNGossip हे सुद्धा वाचा
विशेष म्हणजे या मुलाखतीदरम्यान नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू विवाहित होते. 2017 मध्ये त्यांनी गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर समंथा आणि नाग चैतन्यने घटस्फोट जाहीर केला. घटस्फोटानंतर समंथावर नेटकऱ्यांकडून बरीच टीका झाली होती. तिने नाग चैतन्यला फसवल्याचा आरोपही काहींनी केला होता. मात्र आता नाग चैतन्यचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर भडकले आहेत.
समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य हा अभिनेत्री सोभिता धुलिपालाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावर दोघांनीही अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.