नागा चैतन्यची पहिली बायको मी नाही…, समंथाकडून मोठा खुलासा

| Updated on: Aug 13, 2024 | 10:20 AM

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya: समंथा नाहीतर, कोण आहे नागा चैतन्य याची पहिली पत्नी? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा, समंथा सोबत घटस्फोटानंतर अभिनेत्याने गर्लफ्रेंड शोभिता हिच्यासोबत उरकला साखरपुडा...

नागा चैतन्यची पहिली बायको मी नाही..., समंथाकडून मोठा खुलासा
Follow us on

दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता शोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. गेल्या दिवसांपासून त्यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. अखेर 8 ऑगस्ट रोजी नागा – शोभिता यांनी साखरपुडा करत नात्याची अधिकृत घोषणा केली. पण शोभिता हिच्यासोबत सारपुड्याआधी नागा चैतन्यचा अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट झाला. समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली.

रिपोर्टनुसार, नागा चैतन्य याने जुन्या मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. 2009 मध्ये अभिनेत्याला प्रेम झालं होतं आणि त्यांच्या नात्यात कोणतेच वाद नव्हते. ‘मी स्वतः समंथा हिच्याबद्दल माझ्या आई – वडिलांना सांगण्यात उशीर केला. ज्यामुळे समंथाने मला धमकी देखील दिली होती…’

नागा चैतन्य याने सांगितल्यानुसार, जेव्हा समंथा हिच्यासोबत होते, तेव्हा अभिनेत्री नागा चैतन्य याला राखी बांधण्याची धमकी दिली होती. जेव्हा नागा चैतन्य आणि समंथा एकमेकांना डेट करत होते, तेव्हा ‘फिट अप विद द स्टार’ शोमध्ये समंथाने रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

समंथा म्हणाली होती, ‘मी नागा चैतन्या याची पहिली पत्नी नाही. त्याने त्याच्या उशीसोबत लग्न केलं आहे. उशी चैतन्यची पहिली पत्नी आहे… मला किस करायचं असलं तरी उशी आमच्यामध्ये असायची… नागा चैतन्य पूर्णपणे एक वैवाहिक पुरुष आहे. तो मला पूर्णपणे ओळखतो.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर समंथाने दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. घटस्फोटानंतर पोटगी स्वरूपात नागा चैतन्य याच्याकडून अभिनेत्रीने 250 कोटी रुपये घेतले.

नागा चैतन्य – शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद याठिकाणी साखरपुडा केला. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनेचे फोटो पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या. सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.