Shah Rukh Khan Looks : सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू लाखो -करोडो लोकांच्या हृदयावर झाली आहे. किंग खानसारखं स्टारडम खचितचं दुसऱ्या एखाद्या स्टारला मिळालं असेल. त्याच्या एका स्माईलवर लोक फिदा होतात, पण याच किंग खानच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याला त्याची स्टाइल आणि लूक्समुळे अनेक टोमण्यांचा (criticism) सामना करावा लागला होता.
त्याचं नाक, त्यांची उंची आणि बोलण्याची पद्धत यावरून शाहरूखला एकेकाळी बरंच काही ऐकावं लागलं होतं. खुद्द शाहरुखनेच या गोष्टीचा खुलासा केला होता. तू कधीच हिरो बनू शकणार नाहीस, असं अनेक लोकांनी मला सांगितलं , असंही शाहरूखने नमूद केलं होतं.
एका मुलाखतीदरम्यान शाहरूख म्हणाला होता की त्याला त्याच्या लुक्सवरून बरंच ऐकायला लागायचं. तुझं नाक खराब आहे, तू खूप उंच नाही, तू खूप फास्ट, पटापट बोलतोस, तुझा रंगही सावळा आहे, तू हिरो नाही बनू शकणार, अशा एक ना अनेक गोष्टी मला लोकांनी ऐकवल्या आहेत. खूप मोठमोठ्या व्यक्तींनी मला हे सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं की हे सगळं ठीक आहे, पण मला अभिनयाची आवड आहे, आणि मी ती आवड मारू शकत नाही. मी अभिनय करतंच राहणार.
तू हिरो नाही बनू शकणार
वयाच्या ५७ व्या वर्षीही ‘पठाण’ आणि ‘जवान’ या सारख्या चित्रपटांमधून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या किंग खानला अभिनयाची एवढी आवड होती की त्याने कधीच हार मानली नाही. ‘ मी हिरो वाटत नाही तर नाही. डान्स येत नसेल तर कोणी शिकवेल की आणि मी थोडं शिकेन आणि करेन .’ लोकांच्या टीकेमुळे मी कधीच जजमेंटल झालो नाही आणि कधीच हार मानली नाही.
34 वर्षांपासून किंग खान करतोय चाहत्यांच्या हृदयावर राज्य
शाहरूखची जादू गेल्या 34 वर्षांपासून चालत आहे. 1988 मध्ये ‘फौजी’ मालिकेतून अभिनयाची सुरूवात करणाऱ्या शाहरुखने ‘दीवाना’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘ परदेस’, बाजीगर, ‘बादशाह’, ‘कुछ-कुछ होता है’, देवदास, ‘कभी खुशी कभी गम’, ‘स्वदेस’ यासारखे अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
बॉलीवूडचा खरा बादशाह
नुकताच रिलीज झालेला ‘पठान’ हा शाहरुखच्या करीअरमधील सर्वात मोठा, यशस्वी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात बंपर कमाई केली. याच चित्रपटाद्वारे शाहरुख खानने आपण आजही बॉलिवूडचा बादशाह असल्याचे सिद्ध केले. आता लवकरच शाहरुख खानचा जवान हा चित्रपट येत आहे, ज्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.