बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शक्ती कपूर यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण अनेकदा शक्ती कपूर वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले आहेत. सांगायचं झालं तर, इंडस्ट्रीतून कायम कास्टिंग काऊचच्या घटना समोर येत असतात. एकदा यामध्ये शक्ती कपूर यांचं देखील नाव आलं होतं. शक्ती कपूर यांनी महिलेकडे कामाच्या बदल्यात शरीरिक सुखाची मागीणी केल्याचे आरोप अभिनेत्यावर करण्यात आलं होते.
सांगायचं झालं तर, 2005 मध्ये एका स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये झगमगत्या विश्वात करियर करू इच्छुक असलेल्या मुलीकडे शक्ती कपूर यांनी शरीरिक संबंधांची मागणी केल्याची घटना समोर आली होती. मुलगी कोणी अभिनेत्री नसून महिला पत्रकार होती.
घडलेल्या घटनेनंतर फिल्म एन्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाने शक्ती कपूर यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. पण तेव्हा शक्ती कपूर यांनी सर्व आरोप फेटाळत मोठा खुलासा केला होता. संबंधित मुलीने स्वतःला संपवण्याची धमकी दिल्यामुळे मी तिने बूक केलेल्या हॉटेलच्या रुममध्ये गेलो… या प्रकरणात मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.. असं देखील शक्ती कपूर म्हणाले होते.
घडलेल्या प्रकरणानंतर शक्ती कपूर यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या. यावर शक्ती कपूर म्हणाले होते, ‘मी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीची माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या सर्व वक्तव्यांना चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं.’ असं शक्ती कपूर म्हणाले होते.
शक्ती कपूर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी तब्बल 700 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये खलनायक तर अनेक सिनेमांमध्ये शक्ती कपूर विनोदी अभिनेते म्हणून झळकले. ‘रॉकी’ सिनेमा गाजल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘अंदाज अपना अपना’, ‘राजा बाबू’, ‘जुडवा’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत शक्ती कपूर यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.