अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या त्यांचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगतात. सुष्मिता सेन हिने देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण सुष्मिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सुष्मिता हिने लग्न न करता दोन मुलींना दत्तक घेतलं आणि अभिनेत्री आज ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलींचा सांभाळ करत आहे. पण एकदा अभिनेत्रीला तिच्या मुलींच्या वडिलांबद्दल विचारण्यात आलं आहे. तेव्हा अभिनेत्रीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
खुद्द सुष्मिता हिने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली होती. 29 वर्षीय घटस्फोट झालेल्या महिला म्हणाली होती, तुम्हाला कायम वडिलांच्या नावाची गरज भासते.. तुम्ही भारतात वडिलांच्या नावाशिवाय पासपोर्ट देखील तयार करु शकत नाही. एवढंच नाहीतर, तुम्हाला कोणतं कायदेशीर कागदपत्र देखील तयार करता येत नाही… पण कायद्यामध्ये बदल झाले. कारण वयाच्या 24 व्या वर्षी मी आई झाले.. मी स्वतःच्या बाळाला जन्म देऊ शकत होती. असं असताना मी दोन मुली दत्तक घेतल्या.
‘तेव्हा मला अनेक गोष्टींचा सामना देखील करावा लागला… पासपोर्ट कार्यालयात देखील अनेक गोष्टींचा सामना मी केला आहे. मी पासपोर्ट कार्यालयात गेली तेव्हा मला मुलीच्या वडिलांचं नाव विचारण्यात आलं. मी त्यांना सांगितलं, मी आई आहे… वडिलांच्या जागेवर तुम्ही डॅश करा… अशात मी कोर्टात गेली… कोर्टाने माझ्या वतीने पासपोर्ट ऑफिसमध्ये एक पत्र पाठवलं. पत्र माझ्या बाजूने होतं…’
कोर्टाने घेतलेल्या निर्णयानंतर अभिनेत्री सुष्मिता सेन आनंदी झाली होती. तेव्हा अभिनेत्रीने समाजासाठी एक उदाहरण सेट केलं होतं… सुष्मिता आज तिच्या दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडिआवर मुलींसोबत फोटो पोस्ट करत त्यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असते.
अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुष्मिता हिने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता हिने संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली. योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर नक्की लग्न करेल… असं वक्तव्य सुष्मिता हिने केलं होतं. सांगायचं झालं तर, सुष्मिता हिने अनेक सेलिब्रिटींना डेट केलं आहे. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत अभिनेता रणदीप हुडा याच्यापासून उद्योजक ललित मोदी याच्या नावाचा देखील समावेश आहे.