लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला मातोंडकर नाही झाली आई, ‘या’ कारणामुळे अनेकांनी मारले टोमणे

| Updated on: Sep 25, 2024 | 2:33 PM

Urmila Matondkar: मुस्लीम मुलासोबत लग्न, लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला हिने नाही दिला बाळाला जन्म, अनेकांना मारले टोमणे, भावना व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यााची चर्चा...

लग्नाच्या 8 वर्षांनंतरही उर्मिला मातोंडकर नाही झाली आई, या कारणामुळे अनेकांनी मारले टोमणे
Follow us on

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटासाठी कोर्टात याचिका देखील दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या घटस्फोटाबद्दल जाणून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यामुळे अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

सांगायचं झालं तर, 2016 मध्ये उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी लग्न केलं. उर्मिला हिंदू आणि मोहसिन अख्तर मीर मुस्लिम असल्यामुळे दोघांना देखील ट्रोल करण्यात आलं. लग्नात फक्त कुटुंबिय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर असल्यामुळे देखील अनेकांनी त्यांना ट्रोल केलं.

 

 

मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न करण्यासाठी उर्मिला हिने धर्म परिवर्तन केल्याच्या चर्चांनी देखील एकेकाळी जोर धरला होता. पण रंगणाऱ्या सर्व चर्चा अफवा आहेत… असं म्हणत अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिला. एवढंच नाही तर मातृत्वावर देखील अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं होतं.

उर्मिला म्हणाली होती, ‘आई होण्याचा विचार मी करत आहे आणि नाही देखील… फक्त मला त्याची अपेक्षा नाही. प्रत्येक महिलेसाठी आई होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मातृत्व योग्य कारणांसाठी असावं. मला मुलं आवडतात. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आपल्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. स्वतःचीच मुलं असली पाहिजे असं काहीही नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

कोण आहे मोहसिन अख्तर मीर?

मोहसिन अख्तर मीर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो काश्मिरी मुस्लिम असून तो व्यवसायाने आणि मॉडेल आहे. त्याने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘बीए पास’, ‘लक बाय चान्स’ आणि ‘मुंबई मस्त कलंदर’ सारख्या सिनेमांमध्ये अभिनेता झळकला होता. मोहसिन अख्तर मीर हा पत्नी उर्मिला हिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.