Israel attack : कुठे आहे नुसरत भरुचा? इस्त्रायल हल्ल्यानंतर नाही अभिनेत्रीचा ठावठिकाणा, काय आहे सत्य?

| Updated on: Oct 08, 2023 | 12:56 PM

Israel attack : इस्त्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेकांनी गमावले प्राण, कुठे आहे नुसरत भरुचा? कशासाठी गेली होती इस्त्राईलमध्ये, संपर्क साधणं देखील कठीण, चाहत्यांच्या चिंतेत वाढ... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा.... नुसरत हिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु

Israel attack : कुठे आहे नुसरत भरुचा? इस्त्रायल हल्ल्यानंतर नाही अभिनेत्रीचा ठावठिकाणा, काय आहे सत्य?
Follow us on

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) चढवला. शनिवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या हमास गटाने गाझा पट्टीत हल्ला तीव्र केला. युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वा एका कार्यक्रमासाठी नुसरत इस्रायलला पोहोचली होती. हाइफा इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री उपस्थित होती. या फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीचा ‘अकेली’ सिनेमा दाखवण्यात आला. मात्र आता इस्राईलमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. इस्त्राईलमध्ये झालेल्या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले आहेत, तर अनेक जण जखमी आहेत. अशात नुसरत हिच्यासोबत संपर्क साधणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुची हिची टीम अभिनेत्रीला सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अभिनेत्रीसोबत संपर्क साधणं अशक्य आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या टीममधील एका व्यक्तीने अभिनेत्रीबद्दल मोठी माहिती दिली आहे. नुसरत इस्त्रायलमध्ये अडकली आहे कळताच चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

अभिनेत्रीच्या टीममधील व्यक्ती म्हणाला, ‘नुसरत दुर्दैवाने इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री तिथे गेली होती. नुसरतशी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यादरम्यान ती बेसमेंट पूर्णपणे सुरक्षित होती.’ पण आता अभिनेत्रीसोबत संपर्क होत नसल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे, शुक्रवार नंतर अभिनेत्रीसोबत कोणताही संपर्क झालेला नाही.. अशी माहिती अभिनेत्रीच्या टीमकडूम मिळत आहे. संपूर्ण टीम नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुसरत लवकर लवकर भारतात सुखरूप परतावी.. म्हणून अभिनेत्रीचे चाहते आणि कुटुंबिय प्रार्थना करत आहेत.

अभिनेत्रीचे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत. कारण पॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटनांनी शनिवारी 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले होते. ज्यामध्ये अनेकांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. एवढंच नाही तर अनेक जण जखमी देखील आहेत.

काय आणि नुसरत हिच्या ‘अकेली’ सिनेमाची कथा

नुसरत भरुचा हिच्या ‘अकेली’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झाला होता. इराकच्या गृहयुद्धात एक स्त्री एका अज्ञात ठिकाणी अडकते, तेव्हा आपल्या घरी परतण्यासाठी जे प्रयत्न करते ते सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र नुसरत भरुचा हिची चर्चा रंगली आहे.