मलायका अरोरा – अरबाज खान यांचा मुलगा कोणत्या धर्माचं करतो पालन? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 17, 2024 | 3:21 PM

Malaika Arora - Arbaaz Khan: मलायका अरोरा - अरबाज खान यांच्या मुलाच्या धर्माबद्दल मोठं सत्य समोर, कोणत्या धर्माचं पालन करतो अरहान खान, अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, घटस्फोटानंतर देखील मलायका - अरबाज कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे असतात चर्चेत

मलायका अरोरा - अरबाज खान यांचा मुलगा कोणत्या धर्माचं करतो पालन? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Follow us on

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका – अरबाज यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मलायका – अरबाज यांचं लग्न 12 डिसेंबर 1998 मध्ये झालं. लग्नानंतर मलायकाने मुलाला जन्म दिला. अरबाज – मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान असं आहे. मुलाच्या जन्मानंतर देखील मलायका – अरबाज यांच्यामध्ये वाद होत राहिले. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये मलायका – अरबाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली.

दरम्यान, घटस्फोटाच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये मलायका अरोरा हिने पहिला पती अरबाज खान आणि खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. शिवाय मलायका हिने मुलाच्या धर्माबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. मलयाका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

मलायका म्हणाली, ‘माझे सासू – सासरे कधीच माझ्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव टाकला नाही. सलमा आणि सलीम खान प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. जेव्हा मी कोणतं गाणे कारायचे तेव्हा सलमा आणि सलीम खान म्हणायचे… तू चांगला डान्स केलास. गाण्यात दिसत देखील छान होतीस…’

पुढे मलायका हिने अरबाज याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘अरबाज माझ्यासाठी सपॉर्ट सिस्टम आहे. आज माझ्या आयुष्यात अरबाज नसता तर मी काही करूच शकली नसती. अरबाज याने मला जगायला शिकवलं. तो होता म्हणून मी आयुष्यात फार काही करु शकले.’

‘माझे वडील पंजाबी आणि आई मल्याळम कॅथलिक आहे. पण आईच्या कुटुंबासोबत संबंध अधिक घट्ट आहे. त्यामुळे मी देखील मल्याळम कॅथलिक झाली. माझा मुलगा अरहान चर्चमध्ये जातो. मंदीर आणि मशीदमध्ये जातो. अरहान मला कायम म्हणतो, मी सर्वात आधी भारतीय आहे. माझ्या मुलाचे संस्कार अशा वातावरणात झाले आहेत, ज्याठिकाणी तो स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ शकतो.’

‘अरहान याला स्वतःच्या धर्माचा निवड करण्याचा अधिकार आहे. कोणत्या धर्माचं पालन करायचं… हे पूर्ण अरहान याच्यावर आधारित आहे.’ असं देखील मलायका म्हणाली होती. आज अरबाज – मलायका एकत्र नसले तरी, कठीण काळात दोघे एकमेकांसोबत असतात.