मुंबई : ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून एक चर्चा ही सतत रंगताना दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे बघायला मिळतंय. सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या राय ही फाॅलो करत नाहीये, तिने अमिताभ बच्चन यांना अनफाॅलो केले.
ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असल्याचे सांगितले जात असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा उल्लेख केल्याचे बघायला मिळतंय. आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही स्टेजवर परफाॅर्म करताना दिसत आहे. विशेष म्हणजे आराध्या हिच्या शाळेतील कार्यक्रमात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अगस्त्य नंदा हे पोहचले होते. अमिताभ बच्चन यांनी ब्लाॅगमध्ये लिहिले की, मी लवकरच तुमच्यासोबत असेल…आराध्याच्या स्कूल कॉन्सर्टमध्ये मी व्यस्त आहे.
आराध्याचा परफॉर्मेंस एकदम जबरदस्त राहिला आहे. माझ्यासाठी खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे. स्टेजवर ती एकदम नॅचरल वाट होती छोटी…परंतू आता ती इतकी देखील छोटी नक्कीच राहिला नाहीये. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारोहाच्या वेळी आराध्या बच्चन हिने जबरदस्त परफॉर्मेंस केला.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सतत उलटसुलट चर्चा या सुरू आहेत. मात्र, नेहमीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना ननंद श्वेता बच्चन ही दिसली होती. श्वेता बच्चन ही थेट ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना दिसली होती.