अभिनेत्री मलायका अरोरा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मलायका अनेक वर्षे अभिनेता अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लग्न करणार असल्याचं बोललंं जात होतं. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. आता मलायका एका मिस्ट्री बॉयला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर अभिनेत्री मलायकाने एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मलायका अरोरा पॅरिसमध्ये सध्या सुट्टी घालवत आहे. पण तिच्यासोबत अजून कोणीतरी आहे ज्याच्याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
20 ऑगस्ट 2024 रोजी मलायका अरोराने Instagram वर पॅरिसमधील काही फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री विमानतळाच्या आत चालत असताना आणि तिच्या फ्लाइटच्या खिडकीतून ढगांचे एक दृश्य दिसत आहे. यानंतर मलायकाने काही फोटो त्यात जोडले, ज्यामध्ये ती शहरात तिचा वेळ एन्जॉय करताना दिसली.
मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मलायकाचा मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो. यामध्ये मलायका बेज रंगाचा ड्रेस आणि मस्त सनग्लासेस घातलेली दिसली. यावेळी त्या व्यक्तीने निळा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली होती. फोटोमध्ये दोघेही आरशासमोर पोज देताना दिसले.
याव्यतिरिक्त, रीलमध्ये, मलायका काही चवदार फ्रेंच पदार्थांचा आस्वाद घेताना, पॅरिसच्या रस्त्यावर फिरताना, खरेदी करताना, पर्यटन स्थळांना भेट देताना आणि प्रवासादरम्यान तिने परिधान केलेल्या स्टायलिश पोशाखांचा आनंद लुटताना दिसली. हे फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले, “C’est si Bon. पॅरिसमध्ये माझे 48 तास! संपूर्ण अनुभवासाठी @dreamsetgo.sports धन्यवाद.”
दरम्यान, 9 ऑगस्ट 2024 रोजी मलायकाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. खरंतर, पॅरिसमधून शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री माणसासोबत बसलेली दिसली होती, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता, पण मलायकाच्या या फोटोने लोकांना त्यांच्या नव्या नात्याबद्दल अंदाज लावला होता.