अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी राहत्या घरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. पण मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीचे खरे वडील आणि सावत्र वडील कोण? यावर चर्चा सुरु आहे. सांगायचं झालं तर, अनिल मेहता यांच्या निधनानंतर मोठं सत्य समोर आलं आहे.
अनिल मेहता यांच्या निधनानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकांना जाणून घ्यायचं आहे की, मलायकाचे खरे वडील कोण होते. याशिवाय जर अभिनेत्री आई आणि अनिल यांचा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता, तर आता दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र का राहत होते, हा देखील मोठा प्रश्न आहे. आत्तापर्यंत अनेकांचा असा विश्वास होता की मलायकाचे खरे पिता अनिल मेहता आहेत. पण असं काहीही नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाच्या खऱ्या वडिलांचं नाव अनिल अरोरा असं आहे. अनिल अरोरा पंजाबी कुटुंबातील होते आणि इंडियन नेवीमध्ये कार्यरत होते. दरम्यान, मलायका हिने वडिलांच्या निधनाचं दुःख व्यक्त करत ‘अनिल कुलदीप मेहता’ असं लिहिलं होतं. शिवाय अनिल मेहता यांचा जन्म 1962 मध्ये झाला होता आणि मलायका जन्म 1973 मध्ये झाला. अशात दोघांच्या वयातील अंतरामुळे देखील अनेक चर्चा रंगल्या.
मलायकाच्या आई जॉयस यांचं पहिलं लग्न अनिल अरोरा यांच्यासोबत झालं. त्यानंतर अनिल कुलदीप मेहता यांच्यासोबत. जॉयस यांचं दोघांसोबत घटस्फोट झाला. रिपोर्टनुसार, जॉयस आणि अनिल मेहता यांचा घटस्फोट फार पूर्वी झाला होता. पण दोघांमध्ये मैत्रीचं नातं कायम होतं. अनिल मेहता यांच्या निधनानंतर जॉयस यांनी देखील मोठं दुःख झालं आहे.
जॉयस यांच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल सांगायचं झालं तर, मलायका जेव्हा फक्त 11 वर्षांची होती, तेव्हा मलायका आणि अनिल अरोरा यांचा घटस्फोट ढाला होता. तेव्हा मलायकाची लहान बहीण फक्त 6 वर्षांची होती. रिपोर्टनुसार, मलायका, अमृता यांच्या खऱ्या वडिलांचं नाव अनिल अरोरा असं असून सावत्र वडिलांचं नाव अनिल मेहता असं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनिल मेहता यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे.