मुंबई | अभिनेता संजय दत्त आजही त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सध्या संजूबाबा तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अनेक महिलांसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं. संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचं निधन कर्करोगामुळे झालं. पण अभिनेत्याची दुसरी पत्नी आता काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. संजूबाबा याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रिया पिल्लई असं आहे. जेव्हा संजूबाबा तुरुंगात होता, तेव्हा रिया पिल्लई अभिनेत्याच्या आयुष्यात आली. कठीण काळात साथ दिल्यामुळं संजूबाबाने रिया पिल्लई हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही.
संजूबाबा तुरुंगात असताना रिया हिने कधीच संजय दत्त याची साथ सोडली नाही. रिया ही हैदराबादचे महाराज नरसिंगगीर धनराजगीर ज्ञान बहादूर यांची नात आहे. कठीण काळात साथ दिल्यामुळे संजय याच्या मनात रिया हिच्याबद्दल प्रेम आणि सन्मान अधिक वाढला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने व्हॅलेंटाइन डेचं निमित्त साधत रियाला प्रपोज केलं आणि १९९८ मध्ये लग्न केलं.
संयज दत्त यच्या प्रमाणे रिया पिल्लई हिचं देखील दुसरं लग्न होतं. रिया पिल्लई हिचं लग्न १९८४ साली मायकल वाज यांच्यासोबत झालं होतं. पण १९९४ साली दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजूबाबाने रिया पिल्लई हिला लग्नासाठी मागणी घातली आणि १९९८ साली दोघांनी लग्न केलं.
पण संजूबाबा याच्यासोबत रिया पिल्लई आनंदी नव्हती असं अनेकदा समोर आलं. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्त याने एका पाठोपाठ एक सात सिनेमे साईन केले. ज्यामुळे अभिनेत्याला कुटुंबासाठी वेळ नव्हता.. म्हणून रिया पिल्लई आणि संजय दत्त यांच्या नात्यात दुरावा आहे. अशात रिया पिल्लई हिच्या आयुष्यात प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांची एन्ट्री झाली.
रिया पिल्लई आणि खेळाडूच्या नात्याच्या चर्चा रंगल्यानंतर संजूबाबाने दुसऱ्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. संजूबाबा आणि रिया हिचं २००५ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर रिया पिल्लई हिने प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील अधिक काळ टिकू शकलं नाही. त्यांना एक मुलगी देखील आहे.
आता श्रीमंत घराण्याची लेक आणि संजूबाबाची दुसरी पत्नी काय करते याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया पिल्लई हिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. रिया पिल्लई आता तिच्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिया पिल्लई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.