मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून ‘केबीसी’ या शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडत आहेत. शोमध्ये ज्ञानासोबतच मनोरंजन होत असल्यामुळे ‘कोन बनेगा करोडपती’ शोची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. ‘सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांचा ‘कोन बनेगा करोडपती’ची चर्चा रंगली आहे. शोमध्ये रंगणार प्रश्न – उत्तरांचा खेळ प्रत्येकाला आवडतो. पण कोन बनेगा करोडपती’ शोचे प्रश्न कोण तयार करतं तुम्हाला माहिती आहे? आज जाणून घेवू त्या ‘मास्टर माइंड’ व्यक्तीबद्दल…
‘कोन बनेगा करोडपती’ शोबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. शोची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. बिग बी शोच्या होस्टची भूमिका साकारत आहेत. लाखो लोक शोमध्ये येवून स्वतःचं स्वप्न पूर्ण करतात. पण तुम्हाला माहिती आहे ‘कोन बनेगा करोडपती’ शोचे प्रश्न तयार कोण करतं. फार कमी लोकांना केबीसीसाठी प्रश्न तयार कणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती आहे.
‘कोन बनेगा करोडपती’ शो प्रश्न तयार करण्यासाठी कोणत्याही आयएएस ऑफिसर किंवा शिक्षकांची मदत घेत नाही. तर आज जाणून घेवू त्या ‘मास्टर माइंड’ व्यक्तीबद्दल जो शोसाठी प्रश्न तयार करतो. ‘कोन बनेगा करोडपती’ शोचे निर्माते सिद्धार्थ बसू त्यांच्या टीमसोबत ‘केबीसी’ शोसाठी प्रश्न तयार करतात. सिद्धार्थ बसू यांची टीम अनेक गोष्टींचा विचार करुन प्रश्न तयार करतात. सिद्धार्थ बसू फक्त केबीसीचे निर्मातेच नाही तर, महान क्विज मास्टर म्हणून देखील त्यांची ओळख आहे.
सिद्धार्थ बसू ‘कोन बनेगा करोडपती’ शो प्रश्न तयार करत असले तरी, ‘कोन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन असं समिकरण तयार झालं आहे. ‘कोन बनेगा करोडपती’ शोची वाटचाल अमिताभ बच्चन यांच्यामुळे यशस्वीरित्या पुढे सुरु आहे. सध्या ‘कोन बनेगा करोडपती’ शोचा १५ वा भाग सुरू आहे.
‘कोन बनेगा करोडपती’ शोबद्दल सांगायचं झालं तर, २००० मध्ये ‘केबीसी’ शोची सुरुवात झाली हाती. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर मधल्या एका सीझनसाठी शाहरुख खान याची होस्टची भूमिका बजावली. पण अमिताभ बच्चन यांची जागा किंग खान घेवू शकला नाही. त्यानंतर ‘केबीसी’ शोचा एकही एपिसोड बिग बींशिवाय शूट झाला नाही.