Kapoor Family: बॉलिवूडमधील कपूर कुटुंब हे सर्वात प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक आहे. आज कपूर कुटुंबाची चौथी पिढी बॉलिवूडवर राज्य करत आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर कपूर कुटुंब बॉलिवूड मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कुटुंब म्हणून नावारुपाला आलं. पृथ्वीराज कपूर यांनी 1929 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तलवार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर आणि शशि कपूर यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्यानंतर आए ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी कुटुंबाचा वापसा पुढे नेला… त्यांच्यानंतर आता कपूर कुटुंबाची चौथी पिढी म्हणजे करिश्मा कपूर, करीना कपूर आणि रणवीर कपूर बॉलिवूडवर राज्य करत आहेत.
एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिचा बोलबाला होता. आता करिश्मा बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तर करीना आणि रणबीर आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. तर जाणून घेऊ करिश्मा, करीना आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये सर्वत्र श्रीमंत कोण आहे.
कपूर कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील करिश्मा पहिली महिला आहे. जिने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. 90 च्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.
करिश्माने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण 2012 पासून अभिनेत्री अभिनयापासून ब्रेक घेतला. पण ओटीटीच्या माध्यमातून करिश्मा पुन्हा अभिनयात सक्रिय झाली. शिवाय अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील करिश्मा दिसते. आज करिश्मा कपूर हिचं नेटवर्थ रिपोर्टनुसार 85-90 कोटी आहे.
करीना हिने वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करीनाच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘रेफ्यूजी’ असं आहे. त्यानंतर करीनाने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. CNBC च्या रिपोर्टनुसार आज अभिनेत्री एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे. ती अनेक आलिशान गाड्यांची मालकीण देखील आहे.
रणबीर यांनी ‘सावरिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याने ‘रॉकस्टार’, ‘अॅनिमल’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. आज रणबीर कपूर याची नेटवर्थ रिपोर्टनुसार, 345 कोटी आहे. रणबीर कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.