मुंबई : 18 नोव्हेंबर 2023 | सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या शोच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये प्रसिद्ध रॅपर आणि माजी विजेता एसमी स्टॅन येणार आहे. एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचं विजेतेपद जिंकलं होतं. आता बिग बॉसच्या घरात तो त्याच्या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी येणार आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातील एक गाणं एमसी स्टॅनने गायलं आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या मंचावर एमसी स्टॅन केवळ गाणं गाणारच नाही तर सलमानसोबत मिळून खूप धमालसुद्धा करणार आहे. या एपिसोडमध्ये स्टॅन बिग बॉसच्या विजेत्याबद्दल सांगणार आहे.
‘बिग बॉस 17’मधील स्पर्धक मुनव्वर फारुकी आणि एमसी स्टॅन हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. जेव्हा स्टॅन बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून होता, तेव्हा मुनव्वरने त्याची खूप साथ दिली. आता एमसी स्टॅन हा मुनव्वरला पाठिंबा देताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर एमसी स्टॅनने बिग बॉसच्या मंचावर आपला मित्र मुनव्वर फारुकीला विजेता घोषित केलं आहे. मुनव्वरच हा शो जिंकणार, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. यावर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Promo #BiggBoss17 WKW, #McStan ne #MunawarFaruqui ki tareef, Salman ki bhanji aur Ghar me worldcup fever pic.twitter.com/mel9kKMKty
— The Khabri (@TheKhabriTweets) November 17, 2023
मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याचे अनेक शोज विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. अनेकदा त्याच्या शोजवरही बंदी घालण्यात आली आहे. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी त्याने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये भाग घेतला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. आता बिग बॉससाठी तो एका आठवड्यासाठी तब्बल 7 ते 8 लाख रुपये मानधन घेतोय.
मुनव्वर फारुकी हा मूळचा गुजरातच्या जुनागडचा आहे. तिथून तो वडिलांसोबत मुंबईतील डोंगरी परिसरात राहायला आला. सुरुवातीला त्याने काही छोटी-मोठी कामंसुद्धा केली आहेत. 2019 मध्ये तो स्टँडअप कॉमेडीकडे वळला. गेल्या दोन वर्षांत त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. युट्यूबवर त्याने लाखो सबस्क्राइबर्स आहेत. स्टँडअप कॉमेडी करताना अनेकदा मुनव्वर फारुकीच्या विनोदांवर आक्षेपही घेण्यात आला. त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याला पोलिसांनी अटकही केली होती.