Anant-Radhika Pre-Wedding | प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा अक्षता डोक्यावर पडणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख निश्चित झालीय. दोघे 12 जुलैला मुंबईत लग्न करणार आहेत. त्याआधी अंबानी कुटुंबाने अनंत-राधिकाच भव्य प्री-वेडिंग आयोजित केलं आहे. प्री-वेडिंगच ग्रँड फंक्शन 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये होणार आहे. लग्नाआधीच्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड स्टार्सपासून राजकीय क्षेत्रातील बडे नेते, बिझनेसमॅन आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे सहभागी होणार आहेत.
मुकेश अंबानी यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते आपल्या धाकट्या मुलाच लग्न परदेशात करु शकले असते, पण त्यांनी गुजरातच्या जामनगरचीच निवड का केली? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या. अनंत अंबानी यांनी सांगितलं की, अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वेड इन इंडिया’च अपील केलं होतं. अनंत अंबानी यांना पंतप्रधान मोदींच हे आवाहन खूप भावलं. त्यामुळे त्यांनी देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्री वेडिंग फंक्शन जामनगरमध्ये आयोजित करण्यामागच हे एक कारण आहे.
जामनगरबद्दल विशेष आपुलकी का?
अनंत अंबानी यांनी सांगितलं की, “त्यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला. त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची सुरुवात जामनगरमधून केली. त्यामुळे जामनगरबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे” ‘जामनगरमध्येच मी लहानाचा मोठा झालो’, असं अनंत अंबानी यांनी सांगितलं.
‘वेड इन इंडिया’च अपील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्यावर्षी डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाची निवड करणाऱ्या जोडप्यांना भारतातच लग्न करण्याच अपील केलं होतं. पीएम मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. पीएम मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’च आवाहन केलं होतं.