प्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम यांनी टेलिव्हिजनवरच नाही तर मोठ्या पडद्यावरही लोकांचं मन जिंकलं आहे. भाऊ कदम यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली. भाऊ कदम यांनी सुरुवातीच्या दिवसात अनेक संघर्ष केले. बऱ्याचदा ते लोकल ट्रेनने प्रवास करताना देखील दिसायचे. भाऊ कदम यांना एक मुलगी देखील आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाऊ कदम यांच्या मुलीचे नाव मृण्मयी कदम आहे. जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मृण्मयी युट्यूबवर तिचे व्हिडीओ आणि डेली व्लॉग शेअर करते.
मृण्मयीला नाटकांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. तिला भाऊ कदम यांची मुलगी नाही तर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मृण्मयी कदम हिने नुकतंच तिचं कॉलेज पूर्ण केलं असून ती विदेशात शिफ्ट झाली आहे. विदेशात जात असतानाचा व्हिडिओ देखील तिने शेअर केलाय. मृण्मयी आता अमेरिकेत गेली आहे. आता अनेकांना असा प्रश्न देखील पडला असेल की, ती अमेरिकेत का गेलीये. तर त्यामागचं कारण असं आहे की, तिला आता अमेरिकेत पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. असे तिने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले आहे.
मृण्मयी कदम अमेरिकेला जात असताना भावूक झाली होती. कुटुंबियांना सोडून तिला शिक्षणासाठी अमेरिकेत जात असताना अश्रृ अनावर झाले. कदम कुटुंब तिला सोडण्यासाठी एअरपोर्टवर आले होते. अमेरिकेत ती मैत्रिणींबरोबर राहत आहे. आपल्याला घरच्या व्यक्तींची आठवण सतावत असल्याचं देखील तिने म्हटलं होतं. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी शिकण्यासाठी अमेरिकेत गेल्याने त्याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. भाऊ कदम यांच्या लाखो चाहत्यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मृण्मयी कदमने आपल्या पहिल्या पगारातून वडिलांसाठी एक खास गिफ्ट घेतलं होतं. आपल्या व्हिडिओमध्ये तिने ही गोष्ट शेअर केली होती. अभिनेते भाऊ कदम आता कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. भाऊ कदम सोबत निलेश साबळे आणि ओंकार भोजने हे देखील या कार्यक्रमाचे भाग आहेत.