मुंबई | 19 मार्च 2024 : अभिनेता टायगर श्रॉफ गेल्या काही दिवसांपासून ‘बडे मिया छोटे मिया’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमात अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहेत. पण सिनेमाची चर्चा रंगत असताना, टायगर याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अभिनेत्याने पुण्यात आलिशान घर खरेदी केलं आहे. टायगरच्या नव्या घराची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. सध्या सर्वत्र टायगरच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे.
पुण्यात आलिशान घर घेण्यासाठी टायगर यांने मोठी किंमत मोजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2024 मध्ये अभिनेत्याने स्टॅम्प ड्यूटी देखील भरली आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या नव्या घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे. नव्या घरासाठी अभिनेत्याने 52.5 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. प्रॉपर्टी अभिनेत्या 3.5 लाख रुपये महिना लीजवर दिली आहे.
टायगर सध्या मुंबई येथील खार याठिकाणी पाहतो. मुंबईत अभिनेत्याचं 8 बीएचके फ्लॅट आहे. ज्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावर अभिनेता कायम घराचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टायगर श्रॉफ याची चर्चा रंगली आहे.
एका मुलाखतीत अभिनेत्याने कायम नवं घरेदी करण्याचं कारण सांगितलं होतं. जॅकी श्रॉफच्या प्रॉडक्शनचा ‘बूम’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्यांना स्वतःचं घर देखील विकावं लागलं होतं. तेव्हापासून टायगर कायम नवीन घर खरेदी करण्यास प्राधान्य देतो. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत टायगर देखील अव्वल स्थानी आहे.
टायगर श्रॉफ याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. टायगरच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. एवढंच नाहीतर, अभिनेता चाहत्यांना फिटनेस टिप्स देखील देत असतो. टायगर त्याच्या डान्समुळे देखील चर्चेत असतो.